एक्स्प्लोर

कृषी विभागातील लाचखोर अधिकारी जाळ्यात; 30 हजार घेताना ACB कडून रंगेहाथ अटक

सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लाच लुचपत विभागाचे उप अधिक्षक उमेश पाटील यांनी माहिती दिली आहे.

सांगली : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एसीबीने (ACB) कारवाईचा धडाका लावला असून अनेक सरकारी कर्मचारी व अधिकारी भ्रष्टाचाराच्या कचाट्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नुकतेच एबीसीने सांगली (Sangli) जिल्ह्याच्या कृषी विभागातील गुण नियंत्रकाला ३० हजाराची लाच घेताना अटक केली. कृषी औषध कंपनीच्या इमारतीसाठी निरीक्षण अहवाल देताना येथील गुण नियंत्रकाने लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजाराची लाच घेतांना सांगलीच्या लाच (Bribe) लुचपत विभागाने या गुण नियंत्रकास रंगेहाथ अटक केलीय. संतोष चौधरी असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे. या अटकेनंतर जिल्ह्यातील कृषी विभागात खळबळ उडाली आहे. 

सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लाच लुचपत विभागाचे उप अधिक्षक उमेश पाटील यांनी माहिती दिली आहे. तक्रारदार यांनी तळेगाव एमआयडीसी येथे कृषी औषधाची कंपनी सुरू करण्यासाठी एमआयडीसी कडेगाव सोबत करार केला आहे. एमआयडीसी कडेगाव यांनी दिलेल्या जागेवर तक्रारदारांनी पॅरागॉन अ‍ॅग्री केअर या नावाची शेती औषध कंपनी स्थापन करून त्याचे बांधकाम पूर्ण करून एमआयडीसीकडून पूर्णत्वाचा दाखलाही घेतला आहे. कंपनी स्थापन करण्यासाठी वितरक नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असून यासाठी मध्यस्थामार्फत कागदपत्रे तयार केली. या कागदापत्रावर जिल्हा कृषी विभागकडून इमारतीचा निरीक्षण अहवाल आवश्यक असल्याने जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी गुण नियंत्रण निरीक्षक संतोष चौधरी यांनी 35 हजार रूपये लाच मागणी केली. 

गुण नियंत्रकाकडूनचा निरीक्षण अहवाल महत्वाचा असल्याने तो मिळवण्यासाठी तडजोडीअंती 30 हजार रूपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली असता याची खातरजमा करण्यात आली. आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये गुण नियंत्रण निरीक्षक चौधरी यांनी लाच म्हणून 30 हजार रूपये स्वीकारले असता लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्यांना कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. या कारवाईने कृषी विभागात खळबळ उडाली असून जिल्ह्यात या कारवाई चर्चा रंगली आहे. 

हेही वाचा

कोरोनाने लिंक तुटली, आईच्या निधनानंतर जिद्दीने स्वप्नपूर्ती; तलाठी भाऊसाहेब बनले UPSC अधिकारी

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget