एक्स्प्लोर

'होय, मी भंगारवाला, माझा सोळाव्या वर्षांपासून भंगारचा धंदा, मला त्याचा अभिमान' : नवाब मलिक 

Drugs Case NCB Update Nawab Malik Live : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आज पत्रकार परिषदेत चांगलेच आक्रमक झाले. समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर (BJP) गंभीर आरोप त्यांनी केले.

Drugs Case NCB Update Nawab Malik Live : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आज पत्रकार परिषदेत चांगलेच आक्रमक झाले. समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर (BJP) गंभीर आरोप त्यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, होय, मी भंगारवाला आहे. माझी 100 कोटींची औकात नाही. मी बँकांचे पैसे लुटले नाहीत. मी चेक बाऊंस केले नाहीत, माझ्या घरी CBIची रेड पडली नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मी भंगारचा धंदा केला आहे, असं मलिक म्हणाले. त्यांनी म्हटलं की,  माझं गोडाऊन आहे.  माझ्या आजोबाने कुठल्याही डाकूकडून सोन घेतलं नाही.  मी मुंबईत गोल्ड स्मगलिंग केलं नाही.  मी भंगारवाला आहे. जी वस्तू उपयोगी नसते. त्याचे तुकडे करून पाणी करतो.  नवाब मलिक या शहरातील भंगार काढून त्याचे नट बोल्ट काढून त्याचे पाणी बनवणार, असंही मलिक म्हणाले. 

क्रांती रेडकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाल्या, मी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वाढलेली मुलगी, न्याय करा!

समीर वानखेडे यांची नोकरी जाईल तेव्हा या पिक्चरचा शेवट

मलिक म्हणाले की, वानखेडेंकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षढयंत्र आहे. भाजप नेते या समीर वानखेडेंच्या पाठिशी उभे राहिले. भाजपचे मोठे मोठे नेते NCB कार्यालय जात आहेत. मी आज नावं घेत नाही, हिवाळी अधिवेशनात मी याबद्दल बोलणार आहे. काशिफ खानला अटक केल्यावर भाजपचं पितळ उघडं पडेल, असंही ते म्हणाले. अनेक नेत्यांच्या नावाबद्दल मी पुरावे गोळा करत आहेत. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मी ते सगळे सादर करेल. हे अधिवेशन वादळी ठरेल. माझ्यावर देखील अनेक आरोप होतील. या पिक्चरचा क्लायमॅक्स झाला चित्र बदललं आहे. पुढचं सगळं संजय राऊत करतील. समीर वानखेडे यांची नोकरी जाईल तेव्हा या पिक्चरचा शेवट होईल, असंही ते म्हणाले.

NCB ला दिलेल्या 26 प्रकरणांची चौकशी व्हावी, नवाब मलिकांची मागणी

मलिक म्हणाले की, आज मी DG NCB यांना पत्र लिहिलं आहे. 26 प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ज्यांनी फसवून लोकांना जेलमध्ये टाकले त्यांना न्याय मिळावा.  काल मी एक ट्विट केलं होत picture अभी बाकी है आणि आज ते समोर येत आहे, असं ते म्हणाले. 

हे ही वाचा- Nawab Malik VS Sameer Wankhede : मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच; समीर वानखेडेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती 

मलिक म्हणाले की, जो व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न करत होता तो कोर्टात फेऱ्या मारत होता. जामीन सर्वांचा अधिकार आहे. पण त्यापासून वंचित ठेवण चुकीचं आहे. मलिक यांनी म्हटलं की, पहिल्या पत्नीचा फोटो टाकला कारण त्यांची तशी इच्छा होती असं सांगण्यात आले. सध्याच्या पत्नी बद्दल मी काहीही बोललो नाही. ही लढाई धर्मा विरोधात नाही. काल वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिलं आणि मराठी असल्यामुळे मदत करा असे सांगत आहे. आणि मग नवाब मलिक जन्मापासून मुबईत आहे. त्याचं काय?. भाजपकडून षड्यंत्र रचले जात आहे. फिल्म सिटी मुंबईतून बाहेर जावं, योगींनी त्यासाठी लखनऊ मध्ये फिल्म सिटी बनवली आहे. त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले. 

काशिफ खानवर कारवाई करण्यापासून समीर वानखेडेंनी रोखलं

दाढीवाला काशिफ खान हा Fashion tv चा हेड आहे.  फॅशनच्या नावाने काशिफ खान पॉर्नचा धंदा करतो. तो समीर वानखेडेंचा मित्र आहे. काशिफ खानवर कारवाई करण्यापासून समीर वानखेडेंनी रोखलं असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी केला आहे. दाढीवाला काशिफ खान  देशभरात फॅशन टीव्ही चालवतो. तो फॅशन च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवतो, ड्रग्जचा धंदा करतो. दाढीवाला आणि समीर वानखेडे यांची मैत्री आहे. काही अधिकारी मला सांगतात की, समीर वानखेडे हे त्या दाढीवाल्यावर करावाई करत नाहीत, असंही ते म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget