Mumbai Corona Update | मुंबईत आता कोरोनासाठी 'ड्राईव्ह इन टेस्ट'
मुंबईत आता कोरोनासाठी ड्राईव्ह इन टेस्टचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मुंबईत सध्या भायखळा, परळ, दादर, विक्रोळी, बोरीवली, मुलूंड यांसह अनेक ठिकाणी उपलब्ध अससेल्या पालिकेच्या वाहनतळांवर हा उपक्रम सध्या सुरू आहे.

कोरोना तपासणीची क्षमता दहापटीने वाढवण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा प्रस्ताव, राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल
कोरोना तपासणीची क्षमता दहापटीने वाढवण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. कोविड 19 च्या चाचण्यांना वेग यावा यासाठी राज्य सरकारनं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने केंद्र आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून पूल तपासणीसाठी परवानगी मागितली आहे. पूल टेस्टिंगमध्ये एकाच वेळी दहा नुमन्यांची तपासणी होऊ शकते. जर हे शक्य झालं तर उरलेल्या लाॅकडाऊनच्या काळात वेगाने तपासण्या होण्यास मदत होईल. महाराष्ट्रात पूल टेस्टिंगमुळे तपासणीचा वेग दहा पट वाढेल. सध्या राज्यात रोज 4 ते 5 हजार तपासण्या करण्यात येत आहेत. इस्त्रायल आणि यूएसच्या काही भागात कोरोना चाचणीसाठी पूल टेस्टिंगचा वापर करण्यात आला आहे.























