महापरिनिर्वाण दिन | महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर
दलित समाजाला तसंच अस्पृश्यतेची वागणूक मिळणाऱ्या प्रत्येकासाठीच बाबासाहेबांनी न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला. जातीय भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध ते नुसते लढलेच नाहीत तर दलित समाजातील प्रत्येकाला त्यांनी मानाने जगण्याची शिकवण दिली.
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/oJm6Vb2Goy
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 6, 2019
हमारे संविधान के शिल्पी, और समानता, स्वतंत्रता और भाईचारे के लिए आखिरी सांस तक लड़ने वाले डॉ भीमराव अंबेडकर जी के महापरिनिर्वाण दिवस पर मेरी विनम्र श्रद्धांजलि।#BhimRaoAmbedkar pic.twitter.com/p1NxCTW81P
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 6, 2019
स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल. #महामानव pic.twitter.com/FdLAEAYQIg
— Raj Thackeray (@RajThackeray) December 6, 2019
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने संसदेच्या परिसरातील त्यांच्या पुतळ्यासमोर त्यांना अभिवादन केले.त्यांनी दाखवून दिलेल्या समतेच्या मार्गाने सदैव चालण्याचा निर्धार आणखी बळकट झाला.विनम्र अभिवादन. pic.twitter.com/r1YTZAgpw5
— Supriya Sule (@supriya_sule) December 6, 2019
वाहतुकीमध्ये बदल दादर परिसरातील गर्दी टाळण्यासाठी आज वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. आठ मार्गांवर पार्किंगवर निर्बंध घालण्यात आलं आहेत. शिवाजी पार्क, दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक निर्बंध लादण्यात आले आहेत. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमानुसार पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. तसंच, मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत ज्यामध्ये 14 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 12 लोकल गाड्यांचा समावेश असणार आहे.अदभुत आणि अलौकिक व्यक्तिमत्वाचे धनी महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर! विनम्र अभिवादन..!https://t.co/aCGsiMnjZg#MahaParinirvanDin pic.twitter.com/EQLYB3rFQ8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 6, 2019