एक्स्प्लोर

लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही; राजेश टोपे यांच्याकडून स्पष्ट

लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी कुठलाही निर्णय अद्याप झाला नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.

मुंबई : राज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुकानं उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी पूर्णपणे सीमा बंद करुन काही महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. राज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी काही माध्यमात बातम्या आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. मात्र, अद्याप लॉकाडाऊन वाढवण्यासंबंधी निर्णय झाला नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं. ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे, अशा ठिकाणी जिल्ह्याच्या पूर्णपणे सीमा बंद करून काही अतिशय महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे.

केंद्राचा सुधारित आदेश | देशात आजपासून अटींसह 'ही' दुकानं उघडण्याची सूट

राज्यात 512 कंटेनमेन्ट झोन आहेत. अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता देणार नसल्याचे टोपे यांनी सांगितले. तरी हॉटस्पॉट झोनबाबत मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा रुग्ण सापडल्यास त्याच्या घरातल्या सर्वांना हाइड्रोक्लोरोक्वीन (एचसीक्यू) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरळी, धारावी अशा परिसरासाठी निर्णय घेण्यात आले आहे. झोपडपट्टीच्या भागासाठी संस्थात्मक अलगीकरण देण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्र सरकारकडून 7 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची तयारी देखील राज्य सरकारने दाखवल्याचे त्यांनी सांगितले.

Coronavirus | पोलीस बाप ड्युटीवर, नवजात बाळाचं लांबूनच दर्शन, खबरदारीसाठी कुशीतही घेऊ शकत नाही!

राज्यासाठी दिलासा देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशात राज्यासाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच वेग मंदावला आहे. महाराष्ट्रात डबलिंग रेट हा तीन दिवसांवरुन सातवर गेला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आपल्या राज्यात देशातील सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत देशात एक लाखाहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती टोपे यांनी दिल्या आहेत.

Plasma Therapy | पूल टेस्टिंग व प्लाज्मा थेरपीला केंद्राची मान्यता - आरोग्य मंत्री राजेश टोपे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवालABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधावAjit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget