एक्स्प्लोर

केंद्राचा सुधारित आदेश | देशात आजपासून अटींसह 'ही' दुकानं उघडण्याची सूट

लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरू होती. केंद्र सरकारनं आता त्यात बदल करुन इतर दुकानं सुरू करण्याची मुभा दिली आहे.देशभरात नेमकी कुठल्या भागात आणि कोणती दुकानं सुरु होणार आहेत, हे जाणून घ्या...

मुंबई : देशभरात लॉकडाऊनमध्ये आजपासून मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रेसनोटनुसार, गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. परंतु कंटेनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. तसंच शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बाजारपेठांमधील दुकानं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसंच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल. मद्य विक्री करणाऱ्या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचंही स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे.  सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद राहणार आहेत. तर ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे, असंही सरकारनं स्पष्ट केलंय. महाराष्ट्र सरकार किंवा महापालिकांचा निर्णय आल्याशिवाय दुकानं उघडू नका : वीरेन शाह आजपासून ही दुकानं सुरु होणार
  • ग्रामीण भागात शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने सुरु होतील
  • शहरी भागात एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकाने उघडी राहतील
  • तर मार्केट एरियातली, मॉल्स आणि मॉलमधील दुकाने बंदच राहतील
  • ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्याही फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच डिलीव्हरी करु शकतात
  • लॉकडाऊन दरम्यान रेशन, भाजीपाला आणि फळांच्या दुकानासह केवळ आवश्यक वस्तू असलेली दुकाने उघडण्याची परवानगी आधीपासूनच आहे.
  • दुकाने केवळ 50 टक्के कर्मचार्‍यांसह आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालून उघडता येऊ शकतात.
हे मात्र बंदच राहणार
  • दारुची दुकाने बंदच राहतील
  • शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स अद्याप उघडणार नाहीत
  • कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकाने देखील उघडण्यास परवानगी नाही
  • महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेरील मल्टी-ब्रँड आणि सिंगल मल्टी-ब्रँडची दुकाने उघडणार नाहीत.
  • सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, थिम पार्क, थिएटर, बार बंद राहील.
  •  सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद
केंद्राचा सुधारित आदेश | देशात आजपासून अटींसह 'ही' दुकानं उघडण्याची सूट दुकानं सुरु करताना हे नियम बंधनकारक महत्वाचं म्हणजे या सवलती हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये लागू नाहीत.  आतापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला अशीच दुकानं सुरू होती. आता त्यात बदल करुन इतर दुकानं सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र हे करताना सोशल डिस्टन्सिंग तसंच मास्क घालणे बंधनकारक आणि दुकानांमध्ये 50 टक्केच  कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी, असा नियम घातला आहे. मोठी दुकानं तसेच विविध ब्रँडची मॉलसारखी दुकानांना ही सवलत नाही. राज्य सरकार मात्र आपल्या अधिकारानुसार दुकानं सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत, केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय Coronavirus | राज्यात आज 394 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 6817

महत्त्वाच्या बातम्या

Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget