एक्स्प्लोर

डोंबिवली स्फोटानंतर रिकाम्या घरांवर चोरांचा डल्ला

डोंबिवली : केमिकल स्फोटाने हादरलेल्या डोंबिवलीकरांना आता चोरट्यांचा सामना करावा लागत आहे. कारण स्फोटानंतर आपला जीव वाचवण्यासाठी घर सोडून पळून गेलेल्या नागरिकांची घरंच लुटायला चोरट्यांनी सुरुवात केली आहे.   डोंबिवलीतल्या स्टार कॉलनी आणि गणेश नगर भागात 20 हून अधिक घरफोड्यांची नोंद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे स्फोटात घरदार उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांच्या हतबलतेचा फायदा घेणारे चोरटे पाहून असंवेदनशीलतेचं दर्शन घडत आहे.     प्रोबेस कंपनीमधील स्फोट बॉयलरमध्ये झाला नव्हता. अशी माहिती एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली आहे. कंपनीच्या केमिकल रिअॅक्टरमध्ये हा स्फोट झाल्याचं समजतं आहे. कंपनीत बॉयलरच नसल्याची कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे. या स्फोटातील मृतांची संख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे.     या स्फोटातील मृतांमध्ये कंपनीचे मालक विश्वास वाकटकर यांची दोन मुलं आणि सुनेचा समावेश आहे. स्फोटात सुमित वाकटकर, नंदन वाकटकर आणि सुमितची पत्नी स्नेहल वाकटकर यांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात कंपनीचे मालक विश्वास वाकटकर हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.     स्फोटाची खरी तीव्रता     डोंबिवलीत झालेल्या स्फोटाची तीव्रता किती भीषण होती, हे आज सकाळी खऱ्याअर्थानं समोर आलं. कारण ज्या ठिकाणी स्फोट झाला, तिथे सुमारे 10 फूट खोल आणि किमान 40 फूट रुंद खड्डा पडला आहे.     काल दुपारपासून सुरु असलेल्या बचावकार्यामध्ये ढिगारा हटवण्यात आला. आणि त्यानंतर स्फोटाचं रौद्र रुप समोर आलं आहे. इतकंच नाही तर ब्रोमेस कंपनीला खेटून उभ्या असलेल्या इमारतींचीही काय अवस्था झाली आहे. हेही आता समोर आलं आहे.     भीषण स्फोट सीसीटीव्हीत कैद     ज्या स्फोटानं काल संपूर्ण डोंबिवली हादरली, त्या स्फोटाची भीषणता परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं कैद केली. ते सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं.     डोंबिवली एमआयडीसीतल्या प्रोबेस कंपनीत झालेला स्फोट एवढा भीषण होता की फक्त आवाजानंच आजूबाजूच्या दुकानाच्या काचा फुटल्या. स्फोटाचा आवाज होताच लोक घराबाहेर पडण्यासाठी कशी धावपळ करतायत, याची दृश्यही सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.     प्रोबेस कंपनीपासून साधारण किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या दुकानातली ही दृश्य आहेत. बऱ्याच ठिकाणी काचाच नाही तर काही दुकानांचं अक्षरशः सिलिंग देखील कोसळलं आहे.     भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली     डोंबिवली एमआयडीसीत गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास झालेल्या स्फोटात मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे. तर १४० जण जखमी झाले आहेत. डोंबवली एमआयडीसीतल्या प्रोबेस एन्टरप्रायजेस या केमिकल बनवणाऱ्या कंपनीत केमिकल रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला.     स्फोट इतका भीषण होता की ५ किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरुन गेला. परिसरातल्या इमारतींच्या, गाड्यांच्या काचा फुटल्या. टपऱ्यांवरील पत्रे उडाले, तर शेजारील इतर केमिकल कंपन्याही उद्ध्वस्त झाल्या.     प्रोबसेच्या शेजारीही केमिकल कंपन्या असल्याने आग पसरत गेली. त्यामुळे लागलीच हा परिसर रिकामा करण्यात आला. तसंच इथला वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला.     या स्फोटानं प्रोबेस एन्टरप्रायजेसची 3 मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालीही अनेक कर्मचारी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बॉयलरमधल्या स्फोटामागचं नेमकं कारणं अद्याप समोर आलेलं नाही.     स्फोटातल्या जखमींवर डोंबिवलीतल्या विविध खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.  

संबंधित बातम्या

EXCLUSIVE : असा घडला स्फोट! डोंबिवली स्फोटाचं सीसीटीव्ही फूटेज

केमिकल कंपन्या डोंबिवलीतून हटवणार?

डोंबिवलीत केमिकल कंपनीत स्फोट, चौघांचा मृत्यू

PHOTO: डोंबिवलीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट, धूर आणि काचांचा खच

महत्त्वाच्या बातम्या

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget