पिसाळलेल्या कुत्र्यांची विरारमध्ये दहशत! एकाच दिवशी 28 जणांवर हल्ला, अर्नाळा हादरलं
अर्नाळा गावावर म्हणावं तसं मोठं संकटच उभं राहिलं आहे. या पिसाळलेल्या भटक्या कुञ्याने गावात शनिवारी एका दिवसात 28 जणांवर हल्ला करुन, चावा घेतला आहे.
मुंबई : विरारच्या (Virar News) अर्नाळ्यात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान आधी मधी येणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा अशा बातम्यांमुळे अनेकांच्या चिंतेत वाढ होत असते. अर्नाळा गावामध्ये एका पिसाळलेल्या कुञ्याने धुमाकूळ घातला असून चक्क 28 जणांवर हल्ला केला आहे.यात जखमी झालेल्या नागरिकांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विरारच्या अर्नाळा या गावात शनिवारी 10 ऑगस्ट रोजी एका पिसाळलेल्या कुञ्याने 28 जणांवर हल्ला करुन, त्यांचे लचकेच तोडले आहे. लहानापासून मोठ्यांवर ही या पिसाळलेल्या कुञ्याने चावा घेतला आहे. अर्नाळा गावातील विपुल निजाई या 27 वर्षाच्या तरुणाची बुधवारी पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे. माञ कुत्र्याच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला धड चालता ही येत नाही. त्याच बरोबर गावातील 10 वर्षाचा निनाद डवळेकर, 40 वर्षाचा केवल वैद्य आणि 67 वर्षाच्या शंकुतला मोरे यांच्याबरोबर एकूण २८ जणांवर या पिसाळलेल्या कुञ्याने हल्ला केला आहे. कुञ्याच्या या हल्ल्यात लहानपासून मोठेही जखमी झाले आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या ग्रामपंचायती जवळच्या रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने काही जणांना इतर रुग्णालयात त्यांना जावे लागत आहे.
माणासांबरोबर गावातील इतर कुत्र्यांवरही पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला
अर्नाळा गावात कुञ्याच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. याही अगोदर कित्येकवेळा भटक्या कुञ्यांनी चावा घेतला आहे. तरीही प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. अर्नाळा समुद्र किनारी शहरातील अनेक भटकी कुञे आणून सोडली जात असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. या समुद्र किनारी जवळपास दीड हजार भटकी कुञी आहेत. या कुञ्यांच्या दहशतीने लहान मुलं एकट्याने बाहेर खेळायला पडत नाहीत. हातात काठी घेऊन मुलांना बाहेर पडावं लागतयं. जवळच अर्नाळा समुद्र किनारा असल्याने पर्यटकांचा राबता ही येथे प्रचंड असतो.
अर्नाळा गावावर मोठं संकट
सध्या अर्नाळा गावावर म्हणावं तसं मोठं संकटच उभं राहिलं आहे. या पिसाळलेल्या भटक्या कुञ्याने गावात शनिवारी एका दिवसात 28 जणांवर हल्ला करुन, चावा घेतला आहे. तो कुञा अजूनही सापडला नसल्याने, गावातच आहे. त्यामुळे त्या पिसाळेल्या कुञ्याला जर रेबिज असेल तर त्याने ज्या कुञ्यांचा चावा घेतलाय त्यांना ही रेबिज होऊन ते ही पिसाळतील. आणि मग अर्नाळा गावात अराजकता माजू शकते अशी गंभीर माहिती स्थानिकांनी दिली आहे.