एक्स्प्लोर
...त्यामुळे माझ्या परदेशातील मालमत्तेवर कारवाई करु नका, विजय मल्ल्याचा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज
विजय मल्याची भारतामधील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अमंलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. त्याच्यावर विविध बॅकांचे सुमारे 900 कोटी रुपयांचे कर्जही आहे.
मुंबई : भारतातल्या माझ्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून देणीदारांची (देणेकरी) सर्व देणी देऊ शकता येतील, तेव्हा आता माझ्या परदेशातील मालमत्तेवर कारवाई करु नका, असा दावा करत फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्याने मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे. परंतु अमंलबजावणी संचालनालयाने मल्याच्या या मागणीला विरोध केला आहे.
मल्याची भारतामधील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अमंलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. त्याच्यावर विविध बॅकांचे सुमारे 900 कोटी रुपयांचे कर्जही आहे. परंतु ईडीने वसूल केलेल्या मालमत्तेमधून सर्व देणीदारांची देणी देता येऊ शकतात, संबंधित मालमत्तेच्या समभागांचे भावही वाढत आहेत. त्यामुळे या मालमत्तेमधून माझ्यावर असलेल्या कर्जाचा परतावा होऊ शकतो. त्यामुळे माझ्या परदेशातील मालमत्तेवर कारवाई करु नका, अशी मागणी मल्याच्या वतीने करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठापुढे सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. मल्याची भारताबाहेर अनेक देशांमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. त्यामुळे या मालमत्तेवर ईडीने कारवाई करु नये, अशी मागणी केली आहे. माल्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल असल्यामुळे त्याबाबतच्या कारवाईला त्याला सामोरे जावे लागेल, असे ईडीचे म्हणणे आहे.
...तर विजय मल्ल्या भारताच्या ताब्यात | एबीपी माझा
विजय 'मल्ल्याजी' चोर कसे? : नितीन गडकरी | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement