एक्स्प्लोर
तुकाराम मुंढे आणि मंदा म्हात्रे यांच्यात पुन्हा बाचाबाची

नवी मुंबई : नवी मुंबईत पुन्हा एकदा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यात बाचाबाची झाली. विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट घेतली. परंतु मुंढेंनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही, असा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला.
...तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे
शहराला होणारा कमी दाबाचा पाणीपुरवठा, गणेश मंडळांना कमानीसाठीची परवानगी, अशा अनेक मुद्द्यांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. मात्र चर्चेवेळीच दोघांमध्ये शाब्दिक वाद रंगला. तसंच नवी मुंबई महापालिकेकडून जे ईटीसी अर्थात अपंग प्रशिक्षण केंद चालवलं जातं. त्यात भ्रष्टाचार होत आहे. त्याबाबत आयुक्तांना माहिती देऊनही उपयोग होत नाही, असा आरोप मंदा म्हात्रे यांनी यावेळी केला.आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय एकवटले
दरम्यान, मंदा म्हात्रे आणि तुकाराम मुंढे यांच्यात वादावादी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसंदर्भातही त्याच्या शाब्दिक युद्ध रंगलं होतं. तसंच नवी मुंबईतील गावठाणांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यास तुकाराम मुंढेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा मंदा म्हात्रे यांनी दिला होता. पाहा व्हिडीओअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
