एक्स्प्लोर

VIDEO : आमच्यासाठी मुंबईच! आयआयटी बॉम्बेचं नाव आयआयटी मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On IIT Mumbai : सरकरावर टीका करणारे लोक हे आपली मुले ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचं नाव बदलावं अशी विनंती करणार नाही असं म्हणत फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

मुंबई : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जिंतेद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं आहे. आमच्यासाठी हे मुंबईच आहे, बॉम्बेचं नाव मुंबई (IIT Mumbai) करण्यामागे भाजपचा मोठा वाटा असल्याचं ते म्हणाले. आयआयटी बॉम्बेचं आयआयटी मुंबई असं नाव करावं अशी विनंती आपण पंतप्रधानांना करणार असल्याचंही ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबईतील एका कार्यक्रमात नावावरुन वक्तव्य केलं होतं. आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई केलं नाही यामुळे मला बरं वाटलं असं ते म्हणाले होते. त्यानंतर मनसेने त्यावर आक्रमक भूमिका घेत त्यांना उत्तर दिलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis On IIT Mumbai : आमच्यासाठी मुंबईच

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ नाईकांचा आहे. आमच्याकरता बॉम्बे नाही तर ते मुंबईच आहे. बॉम्बेच्या खुणा या मिटल्या पाहिजेत आणि सगळीकडे मुंबईच असलं पाहिजे. आयआयटी बॉम्बेचं नाव आयआयटी मुंबई असं करण्याची विनंती करणारे पत्र मी स्वतः देशाचे पंतप्रधान आणि मानव संसाधन मंत्र्यांना लिहिणार आहे."

काही लोक सोईस्करपणे, आपल्या मुलांना ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेचं नाव बदलावं अशी विनंती करत नाहीत असा टोला देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांना लगावला.

IT Mumbai Vs IIT Bombay : नेमका वाद काय?

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईऐवजी बॉम्बे नावाच्या वापराचं केलेल्या समर्थनानं मोठी खळबळ उडाली. 'आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवण्यात आलं, त्याचं मुंबई करण्यात आलं नाही, हे चांगलंच झालं,' असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी सोमवारी केलं होतं. आयआयटी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना आहेत असंही वक्तव्य डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला.

Raj Thackeray On IIT Mumbai : महाराष्ट्रविरोधी मळमळ बाहेर

जितेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यानंतर मनसेने आक्रमक होत मुंबई आयआयटी समोर 'आयआयटी बॉम्बे' ऐवजी 'आयआयटी मुंबई' असा मजकूर असलेले पोस्टर लावले. तर राज ठाकरे यांनी यावरुन जोरदार टीका केली.

मुंबई आणि एमएमआर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. जितेंद्र सिंगांचं वक्तव्य हे सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे. महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ पुन्हा बाहेर आली. जितेंद्र सिंगांचा मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरातशी काय संबंध? जितेंद्र सिंग जम्मूचे आहेत, पण असं बोलून त्यांना शाबासकी मिळवायची असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तमाम मराठी जनांनो, आता तरी डोळे उघडा असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Embed widget