एक्स्प्लोर

हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

'तुमच्यात हिम्मत असेल तर जनादेशासाठी निवडणूक लावून दाखवा, असेल हिम्मत तर या एकत्र अंगावर, आम्ही एकटे असलो तरी तुम्हाला पुरुन उरु' असं थेट आव्हान फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिलं आहे.

नवी मुंबई : ‘हिंमत असेल तर जनादेश तपासा आणि पुन्हा निवडणूक लावा’, असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. नवी मुंबईत भाजपकडून आयोजीत करण्यात आलेल्या दोन दिवसीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार जोरदार टीका केली. तसेच तिन्ही पक्षांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय जनता पक्ष समर्थ असल्याचही फडणवीसांनी ठासून सांगितलं. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल वचन बाळासाहेबांना दिलं होतं, पण काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करेन असं वचन बाळासाहेबांना दिलं होतं का? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा विचार दिलाय, तो विचार शिवसेना विसरली असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. भाजप यापुढे राज्यात स्वबळावर सत्ता परत आणेल असंही फडणवीस म्हणाले. तसेच आम्हाला सरकार पडण्याची गरज नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर जनादेशासाठी निवडणूक लावून दाखवा. असेल हिम्मत तर या एकत्र अंगावर, आम्ही एकटे असलो तरी तुम्हाला पुरुन उरु असं थेट आव्हान फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. तसेच हिम्मत असेल तर सावरकरांची बदनामी करणाऱ्याच्या 'शिदोरी' मासिकावर बंदी घालून दाखवा नाहीतर सत्तेसाठी लाचार असल्याचं कबूल करा, असंही फडणवीस म्हणाले. दरम्यान ‘अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल’, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं निर्माण होणार आहे. यावरुन आता काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं जेणेकरुन त्यांचं खरं हिंदुत्वाचं रक्त जागं होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. BJP Andolan | 22 फेब्रुवारीला भाजपचं राज्यभरात आंदोलन | ABP Majha दोन दिवसीय अधिवेशनातील तासाभराच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवरही जोरदार टीका केली. कोरेगाव-भीमा प्रकरणात शरद पवार कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं फडणवीस म्हणाले. शरद पवारांच्या एसआयटीमार्फत तपास करा या मागणीवरही त्यांनी टीका केली आहे. दरम्यान नवी मुंबईत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अधिवेशनाचं उद्घाटन केलं. या राज्यव्यापी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला 80 दिवसांत कसं मूर्ख बनवलं यावर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली. भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला उपस्थित होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget