एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केलीय', देवेंद्र फडणवीसांचा आरोप

ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणुका घेण्याच्या मुद्यावरुन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis On OBC Reservation : ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणुका घेण्याच्या मुद्यावरुन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  फडणवीसांनी म्हटलं की, या सरकारला वेळोवेळी ओबीसी हितासाठी मजबूर केलं आहे.  आज ज्या परिस्थितीत ही कार्यकारिणी होते ती दुख:द आहे.  निवडणुका ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होत आहेत.  हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केलीय, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणीमध्ये ते बोलत होते.  

फडणवीसांनी म्हटलं की, महाविकास आघाडी सरकारनं ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली आहे. यात मोठे षड्यंत्र आहे. सरकारला कोर्टानं सात वेळा तारीख देऊनही कार्यवाही पूर्ण केली नाही. नंतर यांच्या खोट्या सबबींवर तारीख देण्यास कोर्टानं नकार दिला, असं फडणवीस म्हणाले. कोर्टाने ट्रिपल टेस्ट करा असं कोर्टाने 2019 साली सांगितलं.  त्यावेळी ठाकरे सरकार होतं पण सरकारने फार काही केलं नाही. सहा वेळा वेळ मागितली, कार्यवाही पूर्ण केली नाही, असंही त्यांनी सांगितलं. सातत्यानं महाविकास आघाडीकडून विश्वासघाताचं राजकारण केलं जात आहे. योग्य काळजी न घेताच आकडेवारी सरकारनं सादर केली, असंही ते म्हणाले. 

फडणवीस म्हणाले की,  2010 साली 50 टक्के आरक्षण देता येणार नाही आणि ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आरक्षण देता येत नाही असं सांगितलेलं. त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते.  कोर्टात जाणारे कोण आहेत तर एक काँग्रेस आमदारांचा मुलगा तर दुसरा नाना पटोले यांचा कार्यकर्ता.  कोर्टात कोण गेलं तर काँग्रेसवाले गेले.  पण आम्ही सजग होतो आणि आम्ही तात्काळ केंद्र सरकारकडून जनगणनेचा डेटा मागितला.  रातोरात आम्ही अध्यादेश काढला, असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसकडून ओबीसींचा वापर हा दिखाऊपणापुरताच केला गेला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

तोवर महाराष्ट्रातील सर्व निवडणुकीत 27 टक्के तिकिटं ही ओबीसी उमेदवारांनाच

ओबीसी आरक्षणासाठी भाजपनं अनेक आंदोलनं केली. या आरक्षणासाठी भाजप लढतच राहिल. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात निर्णय होणार नाही तोवर येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व निवडणुकीत 27 टक्के तिकिटं ही ओबीसी उमेदवारांनाच देणार असल्याची घोषणा देखील फडणवीस यांनी म्हणाले. 

फडणवीस यांनी म्हणाले की, ट्रिपल टेस्टचा मुद्दा 2019 ला आला. उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे. ट्रिपल टेस्ट पूर्ण करा असे सांगितले यात 15 महिने गेले. सात वेळा सरकारने वेळ मागितली पण यांनी साधा आयोग देखील नेमला नाही. 15 महिन्यानंतर कोर्टाने निरीक्षण नोंदवलं की तुम्हाला वेळ देऊन तुम्ही ट्रिपल टेस्ट केली नाही असे म्हणत कलम स्थगित केले. हे निलज्ज सरकार आहे. या सरकारला पुन्हा कोर्टाने झापले.  राज्य मागास आयोगाने सांगितले की रिसोर्स दिले तर एक ते दीड महिन्यात काम पूर्ण करू.  पण त्यानंतरही मागास वर्ग आयोगाला निधी दिला नाही.  राज्य सरकारने कुठला तरी डेटा घेतला आणि कोर्टात सादर केला. सर्वोच्च न्यायालय भडकले यांनी सांगितले की हा मुख्यमंत्री यांच्यासमोर दिला आहे.  कोर्टाने नाकारले आणि निवडणूका लावायला सांगितले.  विश्वास घाताचे राजकारण दोन वर्षांपासून तयार होत आहे, असं त्यांनी म्हटलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
EVM-VVPAT verification : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
Shirdi Lok Sabha :एकनाथ शिंदेंची शिर्डीत स्नेहलता कोल्हेंसोबत चर्चा, सदाशिव लोखंडेंच्या प्रचाराबाबतचा सस्पेन्स कायम, तिढा कधी सुटणार?
सेनेतील बंडात साथ देणाऱ्या लोखंडेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, एकनाथ शिंदेंची स्नेहलता कोल्हेंशी चर्चा, तिढा कधी सुटणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jitendra Awhad : ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारजमा झालेले ईव्हीएम : जितेंद्र आव्हाडABP Majha Headlines : 07 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBank Of Maharashtra Profit 2024 : बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यात वाढ, चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीरCostal Road Mumbai : कोस्टल रोड आणि सी-लिंक जोडण्यात महत्वाचा टप्पा पूर्ण, 2 हजार टनांचा गर्डर बसवला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
EVM-VVPAT verification : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
Shirdi Lok Sabha :एकनाथ शिंदेंची शिर्डीत स्नेहलता कोल्हेंसोबत चर्चा, सदाशिव लोखंडेंच्या प्रचाराबाबतचा सस्पेन्स कायम, तिढा कधी सुटणार?
सेनेतील बंडात साथ देणाऱ्या लोखंडेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, एकनाथ शिंदेंची स्नेहलता कोल्हेंशी चर्चा, तिढा कधी सुटणार?
Brij Bhushan Singh : लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
बृजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार,  म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...
केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी, निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला
Vishal Patil : तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
Ravi Kishan :  रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
Embed widget