अजित पवार कोरोनामुक्त, रुग्णालयातून डिस्चार्ज
कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर आज ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून त्यांना आजच (2 नोव्हेंबर) डिस्चार्ज मिळाला. अजित पवार आठवडाभर घरातच विश्रांती करणार आहेत. अजित पवार यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून अजित पवार कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं.
थकवा जाणवत असल्याने अजित पवार चार दिवस होम क्वॉरन्टाईन होते. परंतु कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर आज ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले. अजितदादांनी आता आठवडाभर तरी आराम करावा अशी काळजी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार दोन आठवड्यांपूर्वी पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. तरीही त्यांनी शनिवारी (17 ऑक्टोबर) बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपून परतल्यानंतर त्यांना तापही आला होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आली असली तरी थकवा असल्याने त्यांनी घरीच राहून आराम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु 26 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं.
संबंधित बातम्या
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह
अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी, पार्थ पवारांकडून वृत्ताचं खंडन
अजित पवार होम क्वॉरन्टाईन, मात्र व्हिसीद्वारे बैठकीला हजर राहणार!
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली






















