एक्स्प्लोर
देवनारची दुर्गंधी घालवण्यासाठी, महापालिका करणार सुंगधी द्रव्याची फवारणी
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या आसपासच्या परिसरातली दूर्गंधी दूर व्हावी, म्हणून मुंबई महापालिका सुगंधी द्रव्याची फवारणी करणार आहे. या फवारणीसाठी महापालिकेने १ कोटी १५ लाख १५ हजार रुपयांची तरुतूद केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या आगीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नासोबतच जीविताचा प्रश्न उपस्थित झाला होता. या वेळी महापालिका युद्धपातळीवर देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या बाजून संरक्षक भींत, सीसीटिव्ही आदींची व्यवस्था करेल, असे स्पष्ट केले होते.
मात्र, ही कामे अजूनही झाली नसताना, माहापालिकेने सुंगधी द्रव्य फवारणीचा घाट घालण्याचे कारण काय, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement