दिल्लीच्या मरकजवरुन आलेल्या तबलिगींनी स्वत:हून माहिती द्यावी, अन्यथा कडक कारवाईचा मुंबई पोलिसांचा इशारा
तबलिगी जमातच्या लोकांनी पुढे येऊन स्वत:ची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये द्यावी किंवा 1916 या महानगरपालिकेच्या टोल फ्री नंबरवर कळवावी, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे दिल्लीच्या मरकजवरून आलेल्या तबलिगी जमातच्या लोकांनी स्वत:हून पुढे येऊन आपली माहिती द्यावी असं आवाहन केलं आहे. त्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्यावी द्यावी किंवा 1916 या महानगरपालिकेच्या टोल फ्री नंबरवर कळवावी, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. माहिती लपवल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, दिल्लीच्या मरकज येथून आलेल्या तबलिगी समुदायाने आपल्या प्रवासाची माहिती @mybmc helpline 1916 वर कळवा आणि कोरोनाशी लढण्यास सहकार्य करा. जे कुणी मरकजवरून आले असतील आणि ते समोर येऊन सांगणार नाही किंवा माहिती लपवतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.
COVID-19 चा प्रसार रोखण्यासाठी, दिल्लीमधील आयोजित तबलीग़ी मरकजचा भाग असलेल्या सर्वांनी बृ.मुं.म.पा च्या हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर प्रवासाची तपशील माहिती द्यावी अशी विनंती.
असे न केल्यास आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल.#TakingOnCorona — Mumbai Police (@MumbaiPolice) April 6, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्लीतील मरकजवरून आलेल्या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन सहकार्य करावं, असं आवाहन मुंबई पोलीस आयुक्त यांच्याद्वारे करण्यात आलं आहे. 8 मार्च रोजी दिल्लीमध्ये मरकजचा कार्यक्रम पार पडला होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तबलिगी समाजातील लोकांनी सहभाग घेतला होता.
दिल्लीतून 1400 तबलिगी समाजातील लोक महाराष्ट्रात आले होते. त्यातील 1300 लोकांचा शोध लागला असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. मात्र दिल्लीवरून नवीन सूचना येत आहेत, ज्यामध्ये अजून तबलिगी लोक इथे असण्याचं म्हटलं गेलं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनीकडून सुद्धा तबलिगी लोकांना पुढे येऊन सहकार्य करण्यास आव्हान करण्यात आलं आहे.
Sanjay Raut | देव, येशू, अल्लाह मदतीला येणार नाही, मरकज प्रकरणावर संजय राऊतांची टीका
संबंधित बातम्या
- #Markaz | निजामुद्दीनमधलं 'मरकज' दिल्लीतल्या कोरोनाचं केंद्र, 'मरकज' म्हणजे नेमकं काय?
- दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित, 'मरकज' चा संपूर्ण परिसर सील
- Nizamuddin Markaz | 'मरकज' प्रकरणी मौलानासह काही जणांवर गुन्हा दाखल
- Nizamuddin Markaz | रत्नागिरीचं मरकज कनेक्शन उघड
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report





















