एक्स्प्लोर

दादरमधील स्विमिंगपूलमध्ये आलेली मगर प्राणीसंग्रहालयातलीच, नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर; मालकावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा. बेकायदेशीररित्या हे प्राणी संग्रहालय चालवलं जातंय आणि तिथे प्राण्यांची तस्करी देखील होते, असा आरोप मनसेने केला आहे.

मुंबई: दादरच्या शिवाजी पार्कमधील (Shivaji Park) स्विमिंग पूलमध्ये आलेली मगर ही शेजारच्या प्राणी संग्रहालयातीलच स्पष्ट झालं आहे. याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यातून ही मगर शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या प्रकरणी प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.  

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, मगर सापडल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता. मात्र   आता मगर शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा. बेकायदेशीररित्या हे प्राणी संग्रहालय चालवलं जातंय आणि तिथे प्राण्यांची तस्करी देखील होते. 

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या (Shivaji  Park) महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये (Mahatma Gandhi Memorial Swimming Pool)  एक मगर आढळली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. यादरम्यान मगरीने एका कर्मचाऱ्याला चावा देखील घेतला. हाटे 5.30 वाजताच्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या  आणि शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आले होते. त्यानंतर सहा तासांनी मगर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली.   याआधी देखील अजगर आणि सापासारखे अनेक प्राणी त्याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती, त्यामुळे या प्राणीसंग्रहालयावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील अशीच मागणी केली आहे.

प्राणीसंग्रहालयाचे मालक कोण?

 सध्या ही जागा वाईल्ड लाईफ वाँडरर्स नेचर फाउंडेशन यांच्या मालकीची आहे, तर ही जागा नंदकुमार मोघे यांच्या मालकीची आहे. नंदकुमार मोघे आयएएस ऑफिसर होते, ते महाराष्ट्र सरकार मध्ये वाईल्ड लाईफ ॲडव्हायझर, मुंबई महानगरपालिकेमध्ये वाइल्डलाइफ अँड झू अडवायझर, महाराष्ट्र सरकारच्या टायगर सफारीचे को चेअरमन अश्या विविध मोठ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि नंदकुमार मोघे यांचे घरचे संबंध होते. महाराष्ट्रातील अनेक अभयारण्य आणि राष्ट्रिय उद्याने तयार करण्यात बाळासाहेबांनी मोघे यांना प्रोत्साहन दिले होते, सध्या मोघे घरीच असतात, त्यांचा मुलगा युवराज मोघे ही फाउंडेशन आणि प्राणी संग्रहालय सांभाळतो. 

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापलेOne Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget