(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, 202 नवे रुग्ण, तर 365 कोरोनामुक्त
Corona Update : मुंबईमध्ये मागील दोन दिवस किंचित वाढणारी रुग्णसंख्या आज नियंत्रणात आली आहे. आज नवे 202 रुग्ण आढळले असून 365 कोरोनामुक्त झाले आहेत.
Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) मागील दोन दिवसत वाढत असलेली नव्या कोरोनाबाधितांची संख्या (Corona Updates) आज कमी झाली आहे. आज 202 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कालच्या तुलनेत 57 रुग्ण कमी आढळले आहेत. कारण गुरुवारी 259 नवे कोरोनाबाधित आढळले होते. मागील तीन दिवस मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाले नसताना आज मात्र एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2627 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 220 दिवसांची वाढ झाली आहे. कारण मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 इतका होता.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 202 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 365 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 780 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 259 रुग्णांपैकी 20 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 319 बेड्सपैकी केवळ 838 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.03% टक्के इतका झाला आहे.
राज्यात 2 हजार 68 नवे कोरोनाबाधित
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी दोन हजार 68 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर चार हजार 709 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत कोरोनामुळे 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases : देशात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात; 24 तासांत 25 हजार 920 नवे कोरोनाबाधित
- Coronavirus : भारतात कोरोनामुळे 30 लाखांपेक्षा जास्त मृत्यू?, केंद्र सरकारने दिले उत्तर
- कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha