एक्स्प्लोर

पुणे, भोसरी एमआयडीसी मनी लाँड्रींग प्रकरण: एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींच्या ईडीत कोठडीत वाढ

एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना 19 जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्याचे पीएमएलए न्यायालयाचे निर्देश.

मुंबई : पुण्यातील भोसरी, एमआयडीसी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत वाढ झालीय. गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना 19 जुलैपर्यंत ईडीच्याच ताब्यात ठेवण्याचे निर्देश दिलेत.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी मधला सव्‍‌र्हे क्र. 52/2 (अ) ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी या मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंदही केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि उकानींच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबिय सरकारनोंदी कागदोपत्री मालक झाले आहेत. मात्र, या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा एक मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

या प्रकरणात अखेर खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मागील मंगळवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. आणि त्याच रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने 15 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. गुरुवारी कोठडी संपत असल्यानं गिरीश चौधरी यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा, सदर प्रकरणातील व्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध आहे. त्यासंदर्भात पुढील तपास आणि पुरावे गोळा करण्यासाठी तसेच इतर महत्वाच्या चौकशीसाठी चौधरी यांच्या कोठडीत वाढ देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्यावतीने न्यायालयात करण्यात आली. त्यांची मागणी मान्य करत न्यायालयाने चौधरी यांच्या ईडी कोठडी 19 जुलैपर्यंत वाढ केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget