एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Coronavirus | कोरोनाच्या महामारीत तुम्ही निवांत फिरताय? इटालियन नागरिकाचा हा भीषण अनुभव नक्की वाचा

कोरोनाच्या या भीषण स्थितीत सर्वांनी खबरदारी घ्यावी. मला काही होणार नाही हा समज डोक्यात ठेऊ नका. महत्वाचे म्हणजे घरात रहा.

मुंबई : जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीन, इटलीमध्ये सर्वाधिक बळी यामुळे गेले आहेत. अशा स्थितीत आता चीन, इटलीसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाबत जागरुकता आणि उपाययोजना वाढीस लागली आहे. चीननंतर इटलीत या महामारीने सर्वाधिक हाहाकार माजवला आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु या सर्व परीस्थितीत तुम्ही निवांत फिरत आहात. मित्रांसोबत बार, हाॅटेलमध्ये फिरत असाल किंवा गर्दीच्या ठिकाणी गरज नसताना असुरक्षितरीत्या फिरत असाल तर इटलीच्या या व्यक्तीच्या या भावना आपण नक्की वाचल्या पाहिजेत. इटालियन व्यक्तीने व्यक्त केलेल्या भावना ही गोष्ट कशी वाढत गेली? स्टेज 1: आपल्याला माहिती झालं की कोरोना नावाचा वायरस आला आहे. आपल्या देशात याचा पहिला रुग्ण सापडला. काही होणार नाही, हा फक्त एक छोटा आजार आहे. माझे वय कुठे 75+ आहे. मी एकदम ठणठणीत आहे. मी सुरक्षित आहे. मला काही होणार नाही, मास्क लावायची गरज नाही. घाबरायचे कारण नाही, नेहमीप्रमाणे आपले काम सुरु ठेवावे. स्टेज 2 : कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. काही भागास 'रेड झोन' घोषित करण्यात आले. ज्या ठिकाणी पहिले रुग्ण सापडले त्या ठिकाणी रुग्णाची संख्या वाढत आहे. (फेब्रु 22) थोडी काळजी करणे साहाजिक आहे परंतु सरकार योग्य उपाययोजना करत आहे. काही लोकांचा मृत्यू होतो पण ते लोक वयस्कर आहेत. मीडिया टीआरपीकरता जास्त घाबरवत आहे. लोकांचे आयुष्य सुरळीत सुरु आहे. मी माझेही आयुष्य तसेच सुरु ठेवतो. मीडियामुळे मी माझे काम थांबणार नाही. मला काही होणार नाही सर्वकाही ठीक आहे.

Coronavirus | कोरोना संदर्भात कॅबिनेट बैठकीत चर्चा, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या 'या' 15 महत्वाच्या गोष्टी

स्टेज 3 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एका दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट झाली. मृतांची संख्या वाढत आहे. 4 भागांना रेड झोन घोषित करण्यात आले आणि ज्या भागात जास्त रुग्ण आढळले ते ठिकाण अलिप्त ठेवतात. (मार्च 7) 25 टक्के इटली बंद करण्यात आली. या भागातील शाळा, विद्यापीठ बंद परंतु हाॅटेल, बार, कार्यालय आताही सुरु आहेत. सरकारने दिलेला आदेश काही वृत्तपत्रात आला. आदेशानंतर या भागातील 10 हजार लोक रातोरात आपल्या घराकडे परतले. (हा प्रसंग महत्वाचा आहे) बाकी 75 टक्के इटली नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगत आहे. अजूनही बहुसंख्य लोकांना परिस्थितीचं गांभीर्य कळलेलं नाही. टीव्ही, मोबाईल सर्वत्र आजार होऊ नये म्हणून यासाठी काय काळजी घ्यावी, याची सूचना देण्यास सुरुवात झाली. परंतु लोक अद्याप या गोष्टीला गांभीर्याने घेत नाहीत. स्टेज 4 रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एक महिन्यापासून शाळा आणि विद्यापीठ बंद आहेत. देशात आरोग्याची आणीबाणी जाहीर करण्यात आली. कोरोना पेशंटकरता दवाखान्यात जागा वाढवण्यात आल्या. डाॅक्टर आणि नर्सचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवेवर परत बोलावले आणि मेडिकलच्या शेवटच्या दोन वर्षातील विद्यार्थ्यांना सेवेत घेतले. डाॅक्टर आणि नर्स यांना कोरोनाची लागण होत आहे आणि त्यांच्या कुटुंबात आजार पसरत आहे. न्युमोनियाचे अनेक रुग्णही दाखल होत आहेत आणि आयसीयूमध्ये जागेची कमतरता जाणवत आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टर जगण्याची शाश्वती असलेल्या रुग्णांची निवड करत आहेत. वयस्कर आणि अशक्त रुग्णांवर उपचार केला जाणार नाही, कारण कोरोना रुग्ण हे प्राधान्यावर आहेत. साधनांची कमतरता जाणवत आहे. त्याकरिता उपलब्ध साधनाचा वाटप करुन वापर करण्यात येत आहे. आपणास हा विनोद वाटेल परंतु ही सत्यपरिस्थिती आहे. लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, कारण रुग्णालयात जागा नाही. माझा डाॅक्टर मित्र काॅल करुन रडला कारण त्याच्यासमोर तीन लोक उपचाराअभावी मृत्युमुखी पडले. नर्सही रडत आहेत कारण ॲाक्सिजन देण्यापलिकडे त्या कुठलाही इलाज करु शकत नाहीत. मित्र आणि नातेवाईकांचा मृत्यू झाला कारण त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. सगळीकडे हाहाकार माजला आहे. संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली आहे. सर्वत्र कोरोना व्हायरस विषयीच चर्चा आहे. स्टेज 5 10 हजार मूर्ख लोक वाटले का जे रातोरात उर्वरित 75 टक्के इटलीत पळाले होते. संपूर्ण देश कोरोनाबाधित घोषित झाला आहे (मार्च 9) कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणे हे प्रशासनाचं ध्येय आहे. लोक अजूनही कामाला जात आहे, खरेदी करु शकतात, औषधे घेऊ शकतात कारण अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते. फक्त तुम्ही दुसऱ्या शहरात योग्य कारणाशिवाय जाऊ शकत नाही. अनेक लोक मास्क आणि ग्लोज घालून फिरताना दिसत आहेत. हे लोक स्वत:ला सुरक्षित समजतात आणि हाॅटेल, बारमध्ये मित्रासोबत खायला, प्यायला जात आहेत. पुढील स्टेज स्टेज 6 दोन दिवसानंतर संपूर्ण बंद घोषित करण्यात येतो. हाॅटेल, दुकान, बार इतर बंद आहेत. फक्त मेडिकल आणि माॅल सुरु आहे. सर्टिफिकेटशिवाय तुम्ही फिरु शकत नाही. सर्टिफिकेट हे सरकारी कागदपत्र आहे. ज्यामध्ये आपले नाव, पत्ता आणि आपण कोणत्या कामासाठी बाहेर चाललो, हे लिहिलेले आहे. पोलिसांचे अनेक चेक पाॅईंट सुरु आहेत. जर विनाकारण बाहेर आले तर 206 युरो दंड आकारण्यात येत आहे. जर तुम्ही कोरोनाबाधित पेशंट लपवून ठेवला तर 1 ते 12 वर्ष नरसंहाराकरता जेल होऊ शकते. शेवटचा विचार... ही सर्व परिस्थिती 12 मार्चपर्यंतची आहे. दोन आठवड्यात हा व्हायरस एवढा पसरला आणि स्टेज 3 पासून फक्त 5 दिवस चीन आणि कोरियामध्ये या स्टेजच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आपल्याला माहिती नाही की पुढे काय संकट येणार आहे. मी हे सांगू शकतो कारण मलाही दोन आठवड्याआधी कल्पना नव्हती. आपल्या चुकांमुळे हा जीवघेणा व्हायरस वाढला आहे. बाकी देशांना निवांत बघून विश्वास बसत नाही की हे देश या व्हायरसला किती हलक्यात घेत आहेत. जर आपण हे वाचत असल्यास नक्की काळजी घ्या. दुर्लक्ष करुन ही समस्या दूर जाणार नाही. अनेक बाधित लोक सामान्य लोकांमध्ये त्यांच्या माहितीशिवाय फिरत आहेत. सरकारने बंदी जाहीर करुन चांगले काम केले आहे. यामुळेच प्रसार थांबणार आहे. शेवटची विनंती ही आहे की, जिथे 1, 2 पेशंट आहेत त्यांच्याकरता तुम्ही आमच्यापेक्षा फक्त दोन आठवडे मागे आहात. सर्वांनी खबरदारी घ्यावी. मला काही होणार नाही हा समज डोक्यात ठेऊ नका. महत्त्वाचे म्हणजे घरात रहा. हा संपूर्ण संवाद एका इटालियन नागरिकाने सांगितलेला आहे. या संवादाला राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक अमित वानखेडे यांनी भाषांतरित केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Embed widget