एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोना संदर्भात कॅबिनेट बैठकीत चर्चा, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या 'या' 15 महत्वाच्या गोष्टी

बस, ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण गर्दी टाळली नाही तर नाइलाजानं असा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असं ते म्हणाले. ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालं आहे. बस, ट्रेन अत्यावश्यक सेवा आहेत. त्या बंद करु नयेत याच मताचे आम्ही आहोत, असं ते म्हणाले.

मुंबई : आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोरोना संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली तसेच अनेक महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. या बैठकीत शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला. तसंच अनावश्यक गर्दी, प्रवास टाळण्याचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मंत्रालय आणि सरकारी कार्यालयातील संख्या 50 टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न आहे. कमी उपस्थितीत आम्ही कसं काम चालवायचं याचा आढावा घेत आहोत. त्याचा आम्ही विचार करु, असं त्यांनी सांगितलं. आपण जे करता येणं शक्य आहे, ते आपण करतोय. पण सर्वांनी सहकार्य केलं तर संभाव्य धोका आपण टाळू शकतो, असं ते म्हणाले.

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही, मुंबईत लोकल आणि बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी • राज्यात कोरोना पॉझिटिव्ह 41 रुग्ण असून एका वृध्द रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. उर्वरित 40 पैकी 7 रुग्णांमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे असून एक रुग्ण गंभीर आहे. तर 32 जणांमध्ये लक्षणे आढळलेली नाहीत. • रुग्णांमध्ये 28 पुरुष असून 13 स्त्रिया आहेत. • मंत्रालयासह शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार नाहीत. मात्र, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून याविषयी योग्य तो निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल. • सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना शासनाने मर्यादित स्वरुपात काम करण्यास सांगितले आहे. • शहरातील विशेषत: क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पक्षी व प्राण्यांशी संबंधित दुकाने संसर्गाचा धोका गृहित धरुन बंद करण्यात येतील. मात्र भाजीपाला दुकाने सुरुच राहतील. • कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करीत असून खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होम कार्यपद्धती मान्य करण्यात आली आहे. • रेल्वे, बसेस ही सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येणार नाही. मात्र, आवश्यक असेल तेव्हाच नागरीकांनी प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून आवश्यकता भासल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल. • औषधे, बँका, संस्थांचे व्यवस्थापन प्रमुख आणि आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी देखील संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर पुरविणार. गरज असल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार. • कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता गर्दी कमी करणे हा प्रभावी उपाय असून त्यासाठी आवश्यक तेवढा प्रवास करावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. • खासगी व्यतिरिक्त इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयातून नियमित काम सुरुच राहील. मात्र, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आरोग्याची पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. • सध्या परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ आणि बंदरांवर कसून तपासणी सुरु असून विलगीकरणाची व्यवस्था देखील पुरेशी आहे. • प्रसंगी शहरातील मोठ्या हॉटेल्स मध्ये कमी दरात विलगीकरण सुविधाही देण्यात आली आहे. • कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात देखील उपचार करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी. • सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश • राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, • केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP MajhaSanjana Jadhav Accident : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघातPune : धक्कादायक! पुण्यात उच्चशिक्षीत महिलेला 3.5 कोटी रुपयांना गंडाABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 30 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Public Sector Banks: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दरवाजे उघडले, युवकांना प्रशिक्षण देणार, 15 हजार मानधन रुपये मिळणार
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अप्रेंटिसशिपची संधी, दरमहा 15 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटण, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटण, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
Embed widget