coronavirus | मुंबई पोलिस दलातील 191 कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात, परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अभिनाश कुमारही कामावर रुजू
राज्यात गेल्या 24 तासांत 55 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार 328 वर पोहोचला आहे. त्यात 136 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई : मुंबई पोलिस दलातील 191 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करुन मुंबई पोलिस दलातील हे वाघ आता कोरोनाला धडकी भरवतील अशा आशयाचं ट्विट मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. त्यातच परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार हेही आज कामावर रुजू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Guess who’s back? Back again? Heroes are back to serve Mumbai again! 191 Mumbai Police personnel have already beaten COVID19 & returned home while many others are on their way to recovery. And today, Abhinash Kumar, DCP Zone III, reported back on duty too.#आम्हीकर्तव्यावरआहोत pic.twitter.com/FhMzLNcocS
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 18, 2020
दुसरीकडे राज्यात गेल्या 24 तासांत 55 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार 328 वर पोहोचलाय. त्यात 136 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात कोरोनामुळं आतापर्यंत 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 324 पोलिस पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्य भरात 1273 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 12 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये 8 झाले आहेत. सोलापूर, नाशिक, पुणे येथे प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 131 पोलीस अधिकारी आणि 1142 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. एकट्या मुंबई मध्ये 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह झाले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे आम्ही योग्य त्या उपाययोजना करत आहोत. निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. लवकरात लवकर याची दखल घेत योग्य ते उपाययोजना पोलीसांसाठी करायला हव्या असं ही मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे केंद्र पोलीस दलाची मागणी केली होती. जी केंद्राने मान्य केली असून मुंबई 5 कंपन्या दाखल झाल्या आहेत. ज्यामुळे पोलिसांना आराम मिळेल.
राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2127 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 37,136 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 26,164 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
संबंधित बातम्या :