मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सात वर; 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण सात वार्डमध्येच
मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर पोहचली असून एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्ये 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण संख्या आहे. यात नाना चौक, गोवंडीचाही समावेश आहे.
मुंबई : मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर गेली आहे. एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्ये 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. परिणामी प्रशासन हायअलर्टवर गेलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व संवेदनशील भाग सील करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे. आताच्या घडीला मुंबईत बाराशेहून अधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे. धारावी सारखी लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या ठिकाणी कोरोनाने शिरकाव केल्याने कम्युनिटी स्प्रेडची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, जे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. अशा ठिकाणी वेगळी योजना राबवण्यात येत आहे.
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून आताच्या घडीला राज्यात दोन हजारच्या जवळपास कोरोनाची लागण लोकांना झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्याने राज्याचे संपूर्ण लक्ष या शहरात लागले आहे. दरम्यान, कोरोना बाधितांच्या संख्येवरुन मुंबईतील विभागांची वर्गवारी करण्यात आली आहे.
PM Cares Fund | फक्त पंतप्रधान निधीला केलेली मदतच सीएसआर म्हणून ग्राह्य
- जी साऊथ- वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - अतिगंभीर ई वॉर्ड - भायखळा , भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग -- अतिगंभीर
- डी वॉर्ड - नाना चौक ते मलबार हिल परिसर, --अतिगंभीर
- एम ईस्ट* - गोवंडी, मानखुर्दचा समावेश - अतिगंभीर
- *एच इस्ट - वांद्रे पूर्व चा भाग, वाकोला परिसर , कलानगर ते सांताक्रुझ (मातोश्री) - अतिगंभीर
- के वेस्ट - अंधेरी पश्चिमचा भाग --अतिगंभीर
- एल वॉर्ड - कुर्ला परिसराचा समावेश- अतिगंभीर
(30 ते 50 केसेस)
- जी नॉर्थ - दादर, माहिम, धारावी- गंभीर
- के ईस्ट - अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी -- गंभीर
- पि नॉर्थ - मालाड, मालवणी , दिंडोशीचा भाग- गंभीर
- एम वेस्ट - चेंबुरचा समावेश-- गंभीर
- एफ नॉर्थ - सायन, माटुंगा, वडाळा समावेश-- गंभीर एफ साऊथ - परळ, शिवडीचा समावेश -- गंभीर
- एस वॉर्ड - भांडुप, विक्रोळीतील भागाचा समावेश
(15 ते 29 केसेस )
- आर साऊथ - कांदिवली चा भाग
- एच वेस्ट - वांद्रे, सांताक्रुझ पश्चिमचा भाग
- एन वॉर्ड - घाटकोपरचा भाग
- पी साऊथ - गोरेगांवचा भाग
- आर मध्य - बोरिवलीचा भाग
- बी वॉर्ड - मशिदबंदर भाग
(1 ते 14 केसेस)
- आर नॉर्थ - दहिसर चा भाग
- ए वॉर्ड - कुलाबा, कफपरेड, फोर्टचा परिसर
- सी वॉर्ड - पायधुणी, भुलेश्वर
- टी वॉर्ड - मुलुंडचा भाग
पूल टेस्टिंग कोरोना तपासणीची क्षमता दहापटीने वाढवण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. कोविड 19 च्या चाचण्यांना वेग यावा यासाठी राज्य सरकारनं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने केंद्र आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून पूल तपासणीसाठी परवानगी मागितली आहे. पूल टेस्टिंगमध्ये एकाच वेळी दहा नुमन्यांची तपासणी होऊ शकते. जर हे शक्य झालं तर उरलेल्या लॉकडाऊनच्या काळात वेगाने तपासण्या होण्यास मदत होईल.
Devendra fadnavis | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची Exclusive मुलाखत | ABP Majha