एक्स्प्लोर

सरकारी रुग्णालयात मास्कचा तुटवडा; एक मास्क चार दिवस वापरण्याची डॉक्टरांवर नामुश्की

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. सोबतच सरकारी रुग्णालयात मास्कचा तुटवडा जाणवत असल्याने डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना एकच मास्क चार दिवस वापरण्याची वेळ आली आहे.

मुंबई : सरकारी रुग्णालयांमध्ये मास्कचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून रुग्णालयातील वस्तूंचा तुटवडा आणि डॉक्टरांच्या समस्यांबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, पीपीई किट्स आणि उपलब्ध नसलेल्या मास्क याबद्दल सांगण्यात आले आहे. दरम्यान, जे डॉक्टर्स कस्तुरबा रुग्णालयात आणि विमानतळावर कार्यरत होते. त्यापैकी काही डॉक्टर हे करोना संशयित आहेत. त्यामुळे त्यांना अलग ठेवण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मास्क मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, उपचार करणारे डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी एकच मास्क तीन ते चार दिवस वापरत आहेत. तसेच अनेक रुग्णालय हे या तुटवड्याचा सामना करत आहेत.

वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही : WHO

कोरोनाग्ररस्तांवर उपचार करणारे पाच डॉक्टर्स संशयित कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रादुर्भावामुळे लोकांनी मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे. शिवाय, करोनाचा प्रसार रोखता यावा यासाठी सरकारकडून संचारबंदी ही लावण्यात आली आहे. पण, जे डॉक्टर्स या कोरोनाबाबतचे उपचार देत आहेत. त्याच डॉक्टरांना वेगवगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात एक धक्कादायक बाब म्हणजे कस्तुरबा आणि विमानतळावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांपैकी पाच डॉक्टर्स कोरोना संशयित असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसाठी मास्क आणि पीपीई किट्स उपल्ब्ध असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितले जात असताना केंद्रीय मार्ड संघटनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हॉस्पिटलमधील तुटवडा आणि डॉक्टरांच्या समस्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.

India Lockdown : आज रात्री 12 पासून संपूर्ण देश पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी

एका मास्कचा चार दिवस वापर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, पीपीई किट्स आणि उपलब्ध नसलेल्या मास्क याबद्दल सांगण्यात आले आहे. शिवाय, उपचार करणारे डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी एकच मास्क तीन ते चार दिवस वापरत आहेत. तसेच अनेक हॉस्पिटल हे या तुटवड्याचा सामना करत आहेत. आतापर्यंत पाच डॉक्टर करोना संशयित असल्याची माहिती केंद्रीय मार्ड सल्लागार सदस्य डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली आहे. शिवाय त्यांचे रिपोर्ट आज रात्रीपर्यंत येणार आहेत. शिवाय काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना जेवणाच्या समस्येला ही सामोर जावे लागत आहे. त्यामुळे या गोष्टींसह हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मास्क आणि सुरक्षेचे सर्व साहित्य पुरवावे जेणेकरून डॉक्टर्स आणखी चांगली सेवा देऊ शकतील. दरम्यान, राज्यातली सध्याची संख्या 107 वर पोहोचली असून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

India Lockdown| Narendra Modi|रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देश पुढील 21 दिवस लॉकडाऊन :नरेंद्र मोदी

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget