वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही : WHO
वृत्तपत्रामुळे कोरोना व्हायरस पसरतो, या वृत्ताला फेटाळून लावत वृत्तपत्रामुळे कोरोना पसरण्याचा धोका अत्यंत कमी असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने सांगितलं आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संपूर्ण देशभरात हैदोस घातला आहे. अशातच प्रशासनाकडून जनतेला सावध राहून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. देशातील 23 राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसेच लोकांना घरातच राहण्यासही सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना देशासह जगभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी टिव्ही आणि वृत्तपत्र हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. अशातच लोकांमध्ये एक अफवा पसरली होती की, वृत्तपत्रांमुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे. परंतु, हा निव्वळ गैरसमज आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननेदेखील ही बाब फेटाळून लावली आहे.
WHO चं म्हणणं काय?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) ने सांगितल्यानुसार, एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी प्रावस करून आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजेच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ती वस्तू वेगवेगळ्या तापमानामधून, परिस्थितीतून प्रवास करते. त्यामुळे अशा वस्तूंमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते.
पाहा व्हिडीओ : दिल्लीतील शाहीन बागमधील आंदोलन पोलिसांनी हटवलं, 100हून अधिक दिवस सुरू होतं आंदोलन
सुरक्षित आहे वृत्तपत्र, कोणतीही भिती न बाळगता वाचा
अमेरिकेतील एका वैद्यकिय संस्थेने सांगितल्यानुसार, वृत्तपत्रामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. संस्थेने सांगितलं की, वृत्तपत्रामुळे कोरोनाचा व्हायरस पसरणं अशक्य आहे.
दरम्यान, देशावर कोरोनाचं सावट असतानाच अनेक गोष्टींपासून लांब राहण्यास सांगण्यात येत आहे. अशातच अनेकजण हाताळत असलेल्या वस्तूंपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वृत्तपत्र अनेकजण हाताळतात त्यामुळे त्यापासून लांब राहा. लायब्ररी किंवा सोसायटीमध्ये अनेक लोक पुस्तकं, मासिकं हाताळतात. त्यामुळे वृत्तपत्रं, मासिकांपासून लांब राहा. तसेच असं करत असाल तर आपले हात तत्काळ स्वच्छ करा, अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. परंतु, हा गैरसमज असून तुमच्या घरी येणारं वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. एवढचं नाहीतर वृत्तपत्र छापण्याच्या प्रक्रियेत कर्मचारीही काळजी घेत आहेत. वृत्तपत्र सॅनिटाइज केल्यानंतरच प्रेसमधून वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवलं जात आहे. तसेच वृत्तपत्रांची छपाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिन्स पूर्णपणे ऑटोमॅटिक आहेत. त्यामुळे वृत्तपत्रामुळे कोरोना व्हायरस पसरत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आता तुम्ही बिनधास्त वृत्तपत्र वाचू शकता.
याव्यतिरिक्त WHOने सांगितलं आहे की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सांगण्याक आलेल्या सर्व गोष्टींचं लोकांनी पालन करावं. जवळपास 20 सेकंदांपर्यंत हात स्वच्छ धुण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. एवढचं नाहीतर लोकांना घरातच राहण्याचा सल्लाही दिला आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री आठ वाजता पुन्हा देशाला संबोधित करणार मोदी