एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळ्याचा भाव 40 हजारांच्या खाली
सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात जवळपास पाच हजारांची घसरण झाली असून ४० हजारांच्या खाली पोहोचलं आहे. तर चांदी प्रतिकिलो ४० हजार ३०४ रुपये झाली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा परिणाम सराफा बाजारावरही पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील दहा दिवसात सराफा बाजारात सोनं प्रतितोळा सुमारे पाच हजारांनी स्वस्त होऊन ४० हजारांच्या खाली पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात १९४९ रुपयांनी घसरण होऊन प्रति दहा ग्रॅम ३९ हजार ६६१ रुपये झाला आहे. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ६४४५ रुपयांनी घसरला आहे. चांदी प्रतिकिलो ४० हजार ३०४ रुपये झाली आहे.
कोरोनामुळे सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे. गुढीपाडवा आणि लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठीही खुशखबर आहे. परंतु मागील काही दिवसांपासून सराफा बाजारात शुकशुकाट आहे. मात्र तरीही ग्राहकांनी बाजारात पाठ फिरवल्याचंच चित्र आहे.
दुसरीकडे चांदीचा दर प्रति किलो 6445 रुपयांनी घसरला. राजधानी दिल्लीत सोमवारी (१६ मार्च) दिल्लीत सोन्याच्या दरात 455 रुपयांनी वाढ होऊन 41,610 रुपये प्रतितोळा झालं होतं. तर चांदी मात्र 1,283 रुपयांनी घसरुन 40 हजार 304 रुपये किलोंवर पोहोचली होती. शुक्रवारी (१३ मार्च) सोन्याचा दर प्रतितोळा 42 हजार 017 रुपयांवर बंद झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement