एक्स्प्लोर

Corona Death | मुंबईत कोरोनाचा चौथा बळी, कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा आणखी एक बळी गेला आहे. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. मृत व्यक्तीला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे काल 23 मार्च रोजी कस्तुरबा रुणालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर व्यक्ती युएई येथून प्रवास करुन 15 मार्चला अहमदाबाद येथे आली होती. त्यानंतर 20 मार्चला ही व्यक्ती मुंबईत आली होती. या व्यक्तीला उच्चरक्तदाब तसेच अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता.

कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्याने त्यांची तातडीनं चाचणी करण्यात आली होती. त्यांचे रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 101 वर

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. काल संध्याकाळीही सांगलीत चार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

मुंबईतील 12 जणांची दुसरी चाचणी निगेटिव्ह दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय दाखल केलेल्या 12 रुग्णांची दुसरी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व रुग्णांना पुढील 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
  • मुंबई शहर आणि उपनगर - 38
  • पिंपरी चिंचवड मनपा - 12
  • पुणे मनपा – 19
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 4
  • नवी मुंबई – 5
  • कल्याण – 4
  • सांगली- 4
  • अहमदनगर – 2
  • रायगड – 1
  • ठाणे – 2
  • पनवेल- 1
  • उल्हासनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • वसई-विरार- 1
  • सातारा- 2

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
CSMT : सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget