एक्स्प्लोर

Lockdown | लाॅकडाऊनमध्ये बर्थडे पार्टी करणाऱ्या पनवेलमधील भाजप नगरसेवकावर गुन्हा

राज्यात लॉकडाऊन आणि जमावबंदी असतानाही मित्रांसोबत वाढदिवस सेलिब्रेशन करणाऱ्या भाजप नगरसेवकावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई : एकीकडे सरकार, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील असताना, लोकप्रतिनिधीच नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचं चित्र आहे. लॉकडाऊन सुरु असताना बर्थडे पार्टी करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन आणि जमावबंदी असताना देखील मित्रांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणारा पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. नगरसेवकसह त्याच्या 11 साथीदारांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

नगरसेवक अजय बहिरा यांनी स्वत:च्या घरी बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर मित्रांसोबत सेलिब्रेशन करत होते. परंतु पोलिसांनी अचानक धाड टाकली असता तिथे 11 जण उपस्थित होते. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नव्हतं. तसंच जमावबंदी असताना एकत्र येणे, मास्क न घालणे इत्यादी गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आहेत.

Lockdown | लाॅकडाऊनमध्ये बर्थडे पार्टी करणाऱ्या पनवेलमधील भाजप नगरसेवकावर गुन्हा

अजय बहिरा हे पनवेलमधील प्रभाग क्रमांक 20 चे भाजप नगरसेवक आहेत. 10 एप्रिल रोजी अजय बहिरा यांचा वाढदिवस होता. लॉकडाऊन असल्याने त्यांनी घरीच बर्थडे पार्टीचं आयोजन केलं आणि मित्रांनाही आमंत्रित केलं. परंतु राज्यात संचारबदी असल्याने चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव आहे. तरीही अजय बहिरा यांच्यासह 11 जण इमारतीच्या गच्चीवर पार्टी करत होते.

यावेळी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवण्यात आलेच, पण सोशल डिस्टन्सिंगलाही हरताळ फासला. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणं अनिवार्य असताना, कोणीही याचं पालन केलं नाही. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून नगरसेवकासह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget