एक्स्प्लोर

कोरोनाचा परिणाम; शेतकऱ्यांवर हातातोंडाशी आलेला शेतीमाल फेकून देण्याची वेळ

कोरोना व्हायरसमुळे शेतीमालाला बाजरभाव नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुष्काळ, अवकाळी अन् आता कोरोनामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आधी दुष्काळ मग अवकाळी यातून कसाबसा वाचलेला शेतीमाल आता काढणीला आला आहे. मात्र, या कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर मातीमोल होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदील झाला हे. अनेक फळबागायत शेतकरी माल शेतातच फेकून देत आहे. तर, लाखमोलाचा फळे अक्षरशः जनावरांना टाकावी लागत आहे. बाजारपेठा सुरू असल्यातरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश भर सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका जळगाव जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. शेकडो एकरवरील लिंबू विकला जात नसल्याने लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. एकीकडे असे चित्र असताना याच वाया जाणाऱ्या लिबांचा वापर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असल्याचं चित्र जळगाव जिल्हयात पाहायला मिळत आहे.

Lockdown | सांगलीतील मिरजेत लॉकडाऊनमध्येही सामूहिक नमाज पठण, 41 जण ताब्यात

लाखमोलाचा शेतीमाल शेतात पडून

कोरोनाच्या भीतीने मजूर कामावर येत नाहीत आणि आले तरी तोडलेला माल विकला जात नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. विक्रीअभावी माल झाडावरच पिकून खाली पडत असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना झेलावे लागत आहे. एकीकडे नुकसान होत असले तरी याच वाया जाणाऱ्या लिंबाच्या रसाचा उपयोग ग्रामीण भागात शेतकरी सॅनिटायझर म्हणून करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या भीतीने सॅनिटायझर तुटवडा भासत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कोरोनाच्या विरोधातील ही शक्कल चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत भाव आणि बाजारपेठ उपलब्ध नसल्याने उभ्या पिकात जनावरं सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. परभणीतील उजळांबा येथील शेतकरी विलास साखरे यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळी टरबुज घेतले होते. मात्र दोन रुपये किलो भाव, त्यातल्या त्यात इतर भाजीपाला पीकही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतातचं पडून आहे. तर, टरबूज काढण्यासाठी परवडत नसल्याने त्यांनी चक्क त्यांची जनावरं या उभ्या पिकात सोडली आहेत. शिवाय मोठ्या मेहनतीने घेतलेला इतर भाजीपाला पीकही जागेवरच खराब होऊ द्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय.

दिवे लावा, टाळ्या वाजवा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का? बाळासाहेब थोरातांचा संतप्त सवाल

कलिंगडाचे मोफट वाटप कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने बेळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चाळीस टन कलिंगडे मोफत वाटल्याची घटना घडली आहे. कोरोनाचा इफेक्ट आता शेतकऱ्यापर्यंत येऊन पोचलाय. कोरोनाच्या संकटामुळे ग्राहक नसल्याने कलिंगड लागवड केलेल्या शेतकऱ्याला दहा लाखाहून अधिकचा फटका बसला आहे. रायबाग तालुक्यातील खेमलापूर गावातील युवा शेतकऱ्याला दहा लाखाचे नुकसान सहन करावे लागले आहे. अडीच एकर जागेत सिद्धप्पा सनदी या तरुण शेतकऱ्याने कलिंगड लागवड केली होती. कलिंगड पीक हाताशी आले आणि तेव्हढ्यात कोरोनाचे संकट आले. कोरोनाच्या संकटामुळे फळांची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे सिद्धप्पा सनदी या शेतकऱ्याने आपल्या आणि आजूबाजूच्या गावात चाळीस टन कलिंगडे मोफत वाटली. चाळीस टन कलिंगडे मोफत वाटुनही अजून तीस टन कलिंगडे शिल्लक राहिली आहेत. ही कलंगडी सिद्धपा फोडून टाकत आहे. नोकरी सोडून शेतीत वेगळे प्रयोग करून अर्थार्जन करण्याचे स्वप्न पाहिलेल्या सिद्धप्पा याला कोरोनामुळे चांगलाच शॉक बसला आहे.

Lockdown | पंतप्रधान मोदींना प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट का करावा वाटतो : जितेंद्र आव्हाड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Embed widget