एक्स्प्लोर
आमचा खडसेंशी डायलॉग असायचा : अशोक चव्हाण

मुंबई : सरकार आपल्या लोकांना वाचवून विरोधकांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला. आताच्या सरकारचा विरोधकांशी संवादच नाही. आम्ही सत्तेत असताना खडसेंशी डायलॉग असायचा. आता बहुमताच्या जोरावर सर्वच रेटून नेलं जातंय. विरोधकांशी संवाद साधण्याची इच्छाच दिसत नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला गर्दी नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, नाशिकमधील माझ्या सभेला गर्दी नव्हती असं म्हणू शकत नाही. कारण दुपारी प्रचंड ऊन असल्याने लोक सावलीत बसले होते, असं सांगत अशोक चव्हाणांनी नाशिकमधील सभेला झालेल्या कमी गर्दीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं. नागपुरातील शाईफेकीच्या प्रकारामागे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फूस असल्याचा आरोपही 'माझा कट्टा'वरुन अशोक चव्हाण यांनी केला. आमदार प्रशांत परिचारक यांचं सैनिकांबाबतचं वादग्रस्त विधान म्हणजे वैचारिक दिवळखोरी आहे. ही गोष्ट महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं असून, भाजपने परिचारकांवर कारवाई करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. 'माझा कट्टा'वरील अशोक चव्हाण यांचे महत्त्वाचे मुद्दे - स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन सर्व निर्णय घेतले - अशोक चव्हाण - आरएसएसच्या मंडळीची फूस असल्याशिवाय शाईफेकीची हिंमत कसा करु शकतो? - अशोक चव्हाण - शाईफेकीमागे भाजप, संघाची फूस - अशोक चव्हाण - सेना-भाजपचे एकमेकांवरील आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे - अशोक चव्हाण - शिवसेना-भाजप एकमेकांना पूरक, दोघांमधील माहिती आपोआप बाहेर येते - अशोक चव्हाण - पारदर्शकतेच्या गोष्टी करतात, मग ती लॉजिकल एंडला गेली पाहिजे - अशोक चव्हाण - सरकारचा आपल्या लोकांना वाचवून, विरोधकांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न - अशोक चव्हाण - कामत-निरुपम यांच्यात वाद नाही, वैचारिक मतभेद आहेत - अशोक चव्हाण - स्वाभिमान असेल तर शिवसेना सत्ता सोडेल - अशोक चव्हाण - नाशिकमध्ये काल प्रचंड ऊन, लोक सावलीत बसले होते - अशोक चव्हाण - 10 दिवसांत 27 सभा, सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद - अशोक चव्हाण - काही दिवसांनी जाहीर सभा राहणारच नाही, आता सोशल मीडियावरुनच अधिक प्रचार - अशोक चव्हाण - माझ्या जिल्ह्यातील लोकांवर माझं प्रेम, तेही माझ्यावर खूप प्रेम करतात, म्हणून मी इथे आहे - अशोक चव्हाण - सत्तेत असतानाही आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले नव्हते - अशोक चव्हाण - जाहिरातींसाठी भाजपकडे पैसे आले कुठून? - अशोक चव्हाण - नेतृत्त्व करणं म्हणजे तारेवरची कसरत - अशोक चव्हाण - आम्ही सत्तेत असताना विरोधकांशी संवाद असायचा, आता तसं दिसत नाही - अशोक चव्हाण - कुठल्याही पक्षाचा रिझल्ट हा टीम वर्कवर अवलंबून असतो - अशोक चव्हाण - एमआयएम हे भाजपचं प्यादं - अशोक चव्हाण - काँग्रेसला नेतृत्त्वाचा अभाव नाही, नेते खूप आहेत - अशोक चव्हाण - भाजपची वैचारिक दिवाळखोरी झालीय - अशोक चव्हाण - आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर भाजपने कारवाई करावी - अशोक चव्हाण
आणखी वाचा























