एक्स्प्लोर
Advertisement
नारायण राणेंच्या मनधरणीसाठी काँग्रेस हायकमांडच्या हालचाली
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चानंतर आता काँग्रेसच्या गोटातही खळबळ उडाली आहे. पक्षाच्या हायकमांडनं हालचालींना सुरुवात केली असून मुंबईत काँग्रेस नेत्यांनी राणेंची मनधरणी केल्याचं वृत्त आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनी राणेंची भेट घेतली. दिल्लीतील काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसारच ही भेट झाल्याचं वृत्त आहे. भेटीत दोघांनी राणेंची मनधरणी केली. मात्र राणेंनी फारशी दाद दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नारायण राणे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादेतील भेट गुप्त होती. पण ती उघड झाल्यानं भाजपमध्ये गोंधळ उडाल्याचं म्हटलं जातं. भाजपमध्ये एक मोठा दबावगट राणेंविरुद्ध तयार झाला आहे. त्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश आता काही दिवस तरी होल्डवर ठेवण्यात आला आहे.
सुरुवातीला नारायण राणेंचा भाजप प्रवेश सुकर मानला जात होता पण गुप्त भेटीची बातमी फुटल्यानं त्यांच्या पक्षप्रवेशात अडचणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसमध्ये त्यांच्याविरोधात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे.
जर ही भेट गुप्त राहिली असती तर नारायण राणे स्वत:च्या अटींवर भाजपमध्ये प्रवेश करु शकले असते. पण भेटीची बातमी जगजाहीर झाल्यानं त्यांना भाजपच्या अटींवर प्रवेश करावा लागण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
माझा मित्र येतोय, फडणवीसांच्या सूचनेनंतर साक्षात राणेच हजर!
राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
राजकारण
क्राईम
Advertisement