एक्स्प्लोर
कोस्टल रोडचं काम इको फ्रेंडली विटांनी होणार, इस्रायलच्या कंपनीला कंत्राट
कोस्टल रोडला पर्यावरणप्रेमी आणि कोळी बांधवांकडून विरोध करण्यात आला होता. काँक्रीटीकरणामुळे समुद्री जीव धोक्यात येण्याची तसंच माशांच्या अनेक प्रजाती धोक्यात येऊन कोळी बांधवांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे
मुंबई : शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडला पर्यावणप्रेमी आणि कोळी बांधवांकडून होणाऱ्या विरोधावर मुंबई महापालिकेनं नवा उतारा शोधला आहे. कांदीवली ते नरिमन पॉईंटच्या या 35 किमी च्या समुद्रातून जाणा-या या कोस्टलरोडच्या बांधकामासाठी आता काँक्रीटऐवजी पर्यावरणपूरक वीटा वापरल्या जाणार आहेत. इको ब्रीक्सच्या वापरानं समुद्री जीवांना कोणताही धोका निर्माण होणार नाही असा दावा केला जात आहे.
कोस्टल रोड बांधताना समुद्री जीवांचं नुकसान होऊ नये यासाठी बांधकामात काँक्रीटऐवजी पर्यावरणपूरक वीटा वापरल्या जाणार आहेत. या पर्यावरणपूरक वीटा म्हणजे इको ब्रीक्सच्या वापरानं समुद्रीजीवांना कोणताही धोका निर्माण होणार नाही. पर्यावरणपूरक वीटा कोस्टलरोडच्या बांधकामासाठी लवकरच मुंबईत आणल्या जाणार असून यासाठी इस्त्रायलच्या एका कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. कांदिवली ते नरिमन पॉईंटपर्यंत 35 किलोमीटरच्या प्रकल्पासाठी समुद्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जाणार आहे.
कोस्टल रोडला पर्यावरणप्रेमी आणि कोळी बांधवांकडून विरोध करण्यात आला होता. काँक्रीटीकरणामुळे समुद्री जीव धोक्यात येण्याची तसंच माशांच्या अनेक प्रजाती धोक्यात येऊन कोळी बांधवांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर पालिका प्रशासनानं पर्यावरणाचं समुद्री जीवांचं नुकसान होऊ नये यासाठी एक नवं पाऊल उचलल आहे. या पर्यावरणपूरक वीटा म्हणजे इको ब्रीक्सच्या वापरानं समुद्रीजीवांना कोणताही धोका निर्माण होणार नाही. शिवाय, या बांधकामांत वापरलेल्या गोन पिलर्सच्या जागेमध्ये समुद्री जीव आपली अंडीही घालू शकतील.
या नव्या इको ब्रीक्समुळे कोस्टल रोडच्या किंमतीत नेमकी किती वाढ होईल याची निश्चीत माहिती प्रशासनानं दिली नाही. मात्र, महापालिका आयुक्तांच्या म्हणण्यानुसार या पर्यावरण पूरक वीटा कोस्टल रोडसाठी फार महाग ठरणार नाहीत. आदित्य ठाकरेंकडे महाविकास आघाडी सरकारमधलं पर्यावरण खातं आहे. तर, दुसरीकडे कोस्टल रोड हा शिवसेनेसाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे, कोणत्याही विवादाशिवाय हा प्रकल्प पूर्ण व्हावा ही शिवसेनेची इच्छा आहे. त्यासाठीच पर्यावरण प्रेमी आणि कोळीबांधवांची नाराजी दूर करण्यासाठी आता इको ब्रिक्सचा उतारा अवलंबला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली
Fisherman Reaction | कोस्टल रोड प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला आलेले कोळी बांधव काय म्हणाले? | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
जळगाव
Advertisement