एक्स्प्लोर
तिजोरीत खडखडाट, मात्र मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर साडेचार कोटींचा खर्च
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना मुख्यमंत्र्यांच्या लोकसंवाद कार्यक्रम आणि जाहिरातबाजीवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.
मुंबई : एकीकडे राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर असताना दुसरीकडे मात्र जनतेशी संवाद साधण्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे आणि तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून.
जय महाराष्ट्र, दिलखुलास आणि मी मुख्यमंत्री बोलतोय, या जनतेशी संवाद साधणाऱ्या कार्यक्रमासाठी तब्बल 4 कोटी 45 लाख रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे याला अर्थ विभागाकडून परवानगी देण्यात आलेली आहे.
असे खर्च झाले साडे चार कोटी!
एका भागाच्या चित्रीकरणाचा खर्च - 10 लाख रुपये
महिन्यातील दोन भागाचा खर्च - 20 लाख रुपये
एकूण वर्षाचा चित्रीकरणाचा खर्च 2 कोटी 40 लाख रुपये
एका महिन्यात कार्यक्रम दूरदर्शनवरुन प्रसारणाचा खर्च - 75 हजार
प्रसारणाचा वार्षिक खर्च - 9 लाख रुपये
याच कार्यक्रमाच्या जाहिरातीचा खर्च - 16 लाख 34 हजार 400 रुपये
जाहिरातीचा वार्षिक खर्च - 1 कोटी 96 लाख 12 हजार 800 रुपये
असा एकूण - 4 कोटी 45 लाख 12 हजार 800 रुपये वार्षिक खर्च
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना मुख्यमंत्र्यांच्या लोकसंवाद कार्यक्रम आणि जाहिरातबाजीवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. पण करोडो रुपयांचा खर्च करुन ज्या योजना जनतेला सांगितल्या त्या खरंच पोहोचल्या का असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement