एक्स्प्लोर
दोषींवर मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन : रामदास आठवले
कोरेगाव-भीमा हिंसाचारात ज्यांचा हात असेल त्यांच्यावर जरुर कारवाई केली जाईल. असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवलेंना दिलं आहे.
मुंबई : कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आज (शनिवार) त्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या प्रकरणात ज्यांचा हात असेल त्यांच्यावर जरुर कारवाई केली जाईल. असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आठवलेंना दिलं आहे. मात्र, कुणालाही अटक करण्याआधी सगळे पुरावे गोळा करणं आवश्यक आहे. असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनी काल (शुक्रवार) एक पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज (शनिवार) रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली.
'गावात हिंसाचार कोणी घडवला, हे सरकारने शोधून काढावं. तो कोणत्याही समाजाचा नागरिक असो, कारवाई झालीच पाहिजे. हिंसाचारात गावकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे. या अनुचित प्रकाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. प्रशासनाने पुरेशी सुरक्षा दिली नाही', असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
कोरेगाव-भीमा गावाची बदनामी थांबवावी आणि सरकारने नुकसान भरपाई द्यावी, ही आमची प्रमुख मागणी असल्याचं ग्रामस्थ म्हणाले. तसंच दलित आणि मराठा समाजाने शांतता राखावी, असं आवाहनही गावकऱ्यांनी केलं आहे.
संंबंधित बातम्या :
कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ
भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा
दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर
दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे
सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद
पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात
सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement