एक्स्प्लोर

प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करणार : मुख्यमंत्री

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवरील आरोपांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करणार असल्याचं, आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं. तसेच आपल्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करु नका, असा इशारा विरोधकांना दिला.

मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवरील आरोपांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करणार असल्याचं, आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं. तसेच आपल्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करु नका, असा इशारा विरोधकांना दिला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोपांवरुन विधान परिषदेत विरोधकांनी दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवाय या दोन्ही मंत्र्यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली. पण विरोधकांची मागणी फेटाळून लावत, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशा चौकशीसाठी उपलब्ध होत नसल्याचं सभागृहाला सांगितलं. तसेच लोकायुक्त हे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशच आहेत. त्यामुळे मेहतांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करणार असल्याचंही आश्वासन त्यांनी यावेळी सभागृहाला दिली. दुसरीकडे उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार यांच्यात खडाजंगी झाली. सुभाष देशमुख हे शिवसेनेचे असल्याने, मुख्यमंत्री सरकार वाचवण्यासाठी मित्र पक्षांतील मंत्र्यांना अभय देत असल्याचा आरोप केला. त्यावर अनिल परब यांनी कुणालाही वाचवण्याचा प्रश्न नाही असं म्हणत, राष्ट्रवादीचे अदृश्य हात मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी असल्याचा पलटवार केला. काय आहेत प्रकाश मेहतांवर एसआरए घोटाळ्याचा आरोप? मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे. 3K च्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता. पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. संबंधित बातम्या मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री 'माझा'च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना न सांगताच 'अवगत' शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Embed widget