एक्स्प्लोर
महापालिका निवडणुकीत भाजपला कोणीही रोखू शकत नाही: मुख्यमंत्री
मुंबई: 'भाजप हा कुणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही. पण, काही पक्ष हे 'प्रायव्हेट लिमिटेड' आहेत.' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. मुंबईत सुरु असलेल्या भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते.
'युती होणार की नाही याबाबत माध्यमातून वाचायला मिळतं आहे. शहरात महाराष्ट्रात काय होतं ते आम्ही पाहू आपण आपल्या बूथचे सेनापती व्हा. 2017 पालिका निवडणुकीत आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. भाजप कधीही सत्तेसाठी राजाकरण करीत नाही.' असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुकलं. याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही टीका केली.
'मुंबईबाबत जे निर्णय 15 वर्षात झाले नाही ते आपण 20 महिन्यात घेतले. मुंबईचं चित्र आपल्याला बदलायचं आहे. मुंबईतील रस्त्यावरील खड्डे, गटारांची अवस्था या कुणामुळे झाल्या आहेत?' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सेनेवर निशाणा साधला.
'लोकसभा, विधानसभेत आपण आपली ताकद दाखवून दिली आहे. आता पालिका निवडणुका समोर आहेत. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा.' असा आदेश मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement