एक्स्प्लोर

Video संघर्षाचा काळ आठवला, सरन्यायाधीश भूषण गवई गहिवरले; आईंनाही अश्रू अनावर, पदराने डोळे पुसले

आपल्या या प्रेमाच्या वर्षावाने पूर्ण पणे ओतंबून गेलेलो आहे, गेल्या 40 वर्षांपासून आपले आशिर्वाद आणि साथ लाभलेली आहे. जीवनांच्या अंतापर्यंत हे विसरणार नाही.

मुंबई : देशाचे 52 वे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्रपुत्र भूषण गवई (Bhushan gavai) यांचा आज मुंबईत बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातून भूषण गवई यांनी आपला प्रवास उलगडताना भूतकाळातील संघर्षमय काळ सांगितला. सरन्यायाधीशांनी (CJI) अमरावतीपासून सुरू झालेला प्रवास, नागपूर आणि मुंबई-दिल्लीतील अनेक घडामोडी सांगितल्या. वडिलांकडून चळवळीतील काम अनुभवता आल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न जवळून पाहिल्याचंही त्यांनी म्हटलं. वडिलांनी चळवळीला वाहून घेतल्याने आईने खंबीरपणे घरातील सर्वच भावंडांची जबाबदारी पार पडल्याचं सांगताना ते गहिवरलेय.त्यावेळी, भूषण गवईंना अश्रू अनावर (Emotional) झाले होते, तर त्यांच्या आईनेही पदराने आपले डोळे पुसत आनंदाश्रूंना वाट मोकळी केल्याचं पाहायला मिळालं. सभागृहातील हे वातावरण पाहून सारेच काही क्षणासाठी भावूक झाल्याचं दिसून आलं. 

आपल्या या प्रेमाच्या वर्षावाने पूर्ण पणे ओतंबून गेलेलो आहे, गेल्या 40 वर्षांपासून आपले आशिर्वाद आणि साथ लाभलेली आहे. जीवनांच्या अंतापर्यंत हे विसरणार नाही. माझ्या प्रवासाची सुरूवात अमरावतीतून झाली, नगरपरिषदेच्या शाळेतून माझी सुरूवात झाली. आई वडिलांचे संस्कार माझ्यावर आले. त्यामुळे आज मी जो कोणी आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आई वडिलांमुळेच, असल्याचे गवई यांनी यावेळी म्हटले. त्यावेळी परिस्थिती बेताची होती. वडिलानी स्वत:ला चळवळीत झोकून दिलं होतं, आईवर सर्व जबाबदारी आली होती. माझे सर्व कुटुंबीय भाऊ-बहिण आम्ही एकत्रचं होतो. लहानपणापासून आईकडून खूप शिकलो, असे सांगताना सरन्यायाधीश गहिवरल्याचं पाहायला मिळालं. तर, त्याचवेळी व्यासपीठावर असलेल्या त्यांच्या मातोश्री कमलाबाई यांना देखील अश्रू अनावर झाले. त्यावेळी, आपल्या पदाराने त्यांनी डोळे पुसले. सभागृहाती हा क्षण सर्वांनाच भावूक करुन केला. 

पुढे बोलतान गवई म्हणाले की, वडिल जिथे जिथे कार्यक्रमाला जायचे तिथे मी जायचो, समाजाचे तळागाळातील लोकांचे प्रश्न काय असतात मी समजून घेतले. भारतीय राज्यघटना त्यांना ज्ञात होती, माझ्या वाटचालीत राज्य घटनेचा खूप मोठा हात आहे. मला वकिल बनायचं नव्हतं मला आर्किटेक्चर व्हायचं होतं, माझ्या वडिलांची इच्छा होती त्यांना वकिल व्हायचं होतं. मात्र, त्याना होता न आल्याने मी वकिल बनून त्यांची इच्छा पूर्ण केली, असा किस्साही गवई यांनी सांगितला. सन 1985 सालीये मी राजाभाऊ भोसलेंसोबत वकिली चालू केली, राजाभाऊंकडून बरंच शिकायला मिळालं. राजाभाऊंनी आम्हाला मोकळीक दिली होती, वरिष्ठ वकिलांचे युक्तीवाद ऐकता आले. माझा पुढाकाराने उच्च न्यायालायाच्या बार असोसिएशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावता आला. सुप्रीम कोर्टातही चंद्रचूड यांच्या परवानगीने आम्ही पुतळा उभा केला, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे गवई यांनी म्हटले. 

दादासाहेबांचा सल्ला एकूण मी 1990 साली नागपूरला गेलो, तिथेही मला चांगलं शिकायला मिळालं. तेव्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले होते. माझी इच्छा होती मुख्य न्यायाधिश व्हायची, मी ती कधीही लपवून ठेवली नाही. माझज नावही त्यासाठी गेलं होतं, पण नेहमीप्रमाणे  एक दीड वर्ष लटकलं, ती वेगळीच स्टोरी आहे. माझ्या दोन मित्रांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतं आहे. सन 2019 मधील घटना सांगितली नाही तर सर्व अर्धवट राहिल. सर्वोच्च न्यायालयात शेड्युल कास्टचं पद रिक्त होतं, ओक यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टात मुंबईचे तीन न्यायाधीश आहेत. मुंबईचा कोटा फूल आहे, तुम्ही दुसऱ्या मार्गाने जा. मी ते ऐकलं. नागपूरच्या एका जज यांनी सर्व झोपडपट्या पाडण्याचे आदेश दिले होते. मी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, मला आनंद आहे, त्या लाखो लोकांच्या घरावरील छत मला वाचवता आलं. 

फंडामेंटल राईट्सला संसदही हात लावू शकत नाही

गुन्हेगार जरी असला तरी त्यांच्या कुटुंबीयांवरचं छत हे काढून घेता कामा नये, तो त्याचा मुलभूत अधिकारआहे. फंडामेंटल राईट्सचा मूळ गाभा आहे, त्याला पार्लिमेंट हात लावू शकत नाही, अशा शब्दात भूषण गवई यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबईतील सत्कार स्वीकारल्यानंतर दादर चैत्यभूमी येथे जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

हेही वाचा

तयारीला लागा, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याच्या सूचना; अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना उभारी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: मनोज जरांगे चिचुंद्री म्हणाले, मंत्री नितेश राणेंचा पलटवार; आंदोलनाबाबतही भूमिका स्पष्ट
Nitesh Rane: मनोज जरांगे चिचुंद्री म्हणाले, मंत्री नितेश राणेंचा पलटवार; आंदोलनाबाबतही भूमिका स्पष्ट
मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा; विरोधातील याचिका फेटाळल्या
मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा; विरोधातील याचिका फेटाळल्या
Chhagan bhujbal: मराठा आणि कुणबी एक, हा मूर्खपणा; कोर्टाचा दाखला देत छगन भुजबळांचा मनोज जरागेंवर निशाणा
मराठा आणि कुणबी एक, हा मूर्खपणा; कोर्टाचा दाखला देत छगन भुजबळांचा मनोज जरागेंवर निशाणा
भारताच्या तिजोरीत मोठी भर! महिनाभरातच जमा झाले 1.86 लाख कोटी, GST संकलनात मोठी वाढ   
भारताच्या तिजोरीत मोठी भर! महिनाभरातच जमा झाले 1.86 लाख कोटी, GST संकलनात मोठी वाढ   
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Maratha Protest Traffic Jam | Sion-Panvel Highway वर वाहतूक कोंडी, Maratha Andolan चा फटका
Maratha Protest: सीएसएमटीतील परिस्थिती निवळण्यास सुरुवात, थेट आढावा
Amit Shah : अमित शाहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा
Manoj Jarange Patil PC Day 2 : आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थेट मोदी-शाहांना इशारा, UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: मनोज जरांगे चिचुंद्री म्हणाले, मंत्री नितेश राणेंचा पलटवार; आंदोलनाबाबतही भूमिका स्पष्ट
Nitesh Rane: मनोज जरांगे चिचुंद्री म्हणाले, मंत्री नितेश राणेंचा पलटवार; आंदोलनाबाबतही भूमिका स्पष्ट
मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा; विरोधातील याचिका फेटाळल्या
मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा; विरोधातील याचिका फेटाळल्या
Chhagan bhujbal: मराठा आणि कुणबी एक, हा मूर्खपणा; कोर्टाचा दाखला देत छगन भुजबळांचा मनोज जरागेंवर निशाणा
मराठा आणि कुणबी एक, हा मूर्खपणा; कोर्टाचा दाखला देत छगन भुजबळांचा मनोज जरागेंवर निशाणा
भारताच्या तिजोरीत मोठी भर! महिनाभरातच जमा झाले 1.86 लाख कोटी, GST संकलनात मोठी वाढ   
भारताच्या तिजोरीत मोठी भर! महिनाभरातच जमा झाले 1.86 लाख कोटी, GST संकलनात मोठी वाढ   
Manoj Jarange : चार महिन्यात सरकारची काहीच कार्यवाही नाही, आता अॅक्शनला रिअॅक्शन दिली जातेय; मनोज जरांगेंचे वकील काय म्हणाले?
चार महिन्यात सरकारची काहीच कार्यवाही नाही, आता अॅक्शनला रिअॅक्शन दिली जातेय; मनोज जरांगेंचे वकील काय म्हणाले?
Gunratan Sadavarte : आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणताहेत, कारवाईचे आदेश द्या; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणताहेत, कारवाईचे आदेश द्या; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मुंबईत ओबीसी नेते एकवटले, भुजबळांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध
मुंबईत ओबीसी नेते एकवटले, भुजबळांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध
अफगाणिस्तानात भूकंपाने भयाण अवस्था, झटक्यात सगळं उद्धवस्त, 800 नागरिकांचा मृत्यू, 2500 जण जखमी
अफगाणिस्तानात भूकंपाने भयाण अवस्था, झटक्यात सगळं उद्धवस्त, 800 नागरिकांचा मृत्यू, 2500 जण जखमी
Embed widget