एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: लोकलच्या केबिनेमध्ये घुसून पोस्टर लावलं, मराठा आंदोलकांनी काय काय केलं?
Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावरुन गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगेंचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.
Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha
1/7

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मु्द्द्यावरुन गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.
2/7

दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी मराठा आंदोलक दिसून येत आहे.
3/7

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर देखील मराठा आंदोलक गेल्या तीन दिवसांपासून ठाण मांडून आहेत.
4/7

सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलक हलगीवर ठेकाही धरताना दिसले. मात्र आज मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर उभ्या असणाऱ्या लोकलच्या केबिनमध्ये घुसून पोस्टर लावलं.
5/7

लोकलच्या लोको पायलटच्या केबिनमध्ये मराठा आंदोलक घुसले होते.
6/7

लोको पायलटच्या कॅबिनमध्ये एक मराठा लाख मराठाचे पोस्टर लावण्यात आले.
7/7

मराठा आंदोलक बाजूला झाल्यानंतर लोकल सुटली.
Published at : 01 Sep 2025 12:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
जळगाव
भारत
महाराष्ट्र
























