एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आंदोलकांनी पोलिसांच्या बॅरिकेडची केली गाडी; हलगीच्या ठेक्यावरही थिरकले
Maratha Reservation Protest Azad Maidan: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
Maratha Reservation Protest Azad Maidan
1/6

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Azad Maidan: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर (Maratha Reservation Protest Azad Maidan) उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
2/6

या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजपासून (1 सप्टेंबर) पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
3/6

दरम्यान, सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्यभरातून आंदोलकांची मदतीचा ओघ पुरवली जातेय.
4/6

दुसरीकडे सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांनी डान्स करत घोषणाबाजी केली आहे. आंदोलनाचा चौथा दिवस असतानाही आंदोलकांमधील उत्साह कमी झालेला नाही.
5/6

अशातच, काही आंदोलकांनी पोलिसांच्या बॅरिगेटवर बसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या हुल्लडबाज तरुणांचा गोंधळ घालत असलेला व्हिडीओ आता चर्चेचा विषय ठरला आहे.
6/6

मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवाची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज (1 सप्टेंबर) बंद राहणार आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक ही देण्यात आली आहे.
Published at : 01 Sep 2025 08:58 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
राजकारण
व्यापार-उद्योग
























