एक्स्प्लोर
Advertisement
कोपरखैराणेत अनधिकृत झोपड्यांवर कारवाई, दगडफेकीत पोलिस जखमी
कोपरखैराणे रेल्वे स्टेशनसमोरील सिडकोच्या 8 ते 10 एकर भूखंडावर 100 ते 150 अनधिकृत झोपडपट्ट्यांवर वसलेल्या आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैराणेमध्ये अनधिकृत झोपड्यांवर सिडकोने तोडक कारवाईला सुरुवात केली. मात्र कारवाईमुळे संतापलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.
या दगडफेकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर जखमी पोलिसांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
100 ते 150 अनधिकृत झोपडपट्ट्या
कोपरखैराणे रेल्वे स्टेशनसमोरील सिडकोच्या 8 ते 10 एकर भूखंडावर 100 ते 150 अनधिकृत झोपडपट्ट्यांवर वसलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिडको कारवाईची मोहीम हाती घेणार होतं. परंतु आज ह्या कारवाईला सुरुवात झाली.
जमावाचा विरोध
तर सिडकोने मार्च, एप्रिल महिन्यात कारवाई न करता, जून महिन्यात म्हणजेच ऐन पावसाळ्यात कारवाई का केली. या कारवाईमुळे आमचा संसार उघड्यावर पडत आहे, असा आरोप करत जमावाने विरोध केला.
सिडकोचा हलगर्जीपणा
अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाईसाठी सिडकोने नोटीस पाठवली होती. पण योग्य वेळी ठोस कारवाई न केल्याने झोपडपट्ट्या वाढल्या, असा आरोप होत आहे.
कोपरखैराणे रेल्वे स्टेशनबाहेर सिडकोचा साधारण 8 ते 10 एकर भूखंड आहे. टेंडर सिस्टमने हा भूखंड विकण्याचा सिडकोचा मानस होता. पण पाच ते सहा वर्षांपासून अतिक्रमण सुरु आहे. हा भूखंड सिडकोचा असल्याने महापालिकेकडून कारवाई केली जात नव्हती. तर सिडकोने उशिरा कारवाई केल्यामुळे झोपडपट्ट्या वाढत गेल्या.
परिसरात तणाव
मात्र आता कारवाई केल्याने नागरिकांनी असंतोष व्यक्त केला. इथे थोडा वेळ दगडफेक करण्यात आली. त्यानंतर कारवाई अर्ध्या तासासाठी स्थगित केली होती. परिसरात तणावाचं वातावरण असल्याने सीबीडी, कोपरखैराणे आणि ऐरोली पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. तसंच राखीव पोलिस दलालाही बोलवण्यात आलं. पोलिस, लोकप्रतिनिधी सामाजिक प्रतिनिधींकडून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
नागपूर
Advertisement