एक्स्प्लोर

सिडकोकडून घर लाभार्थ्यांना मोठा दिलासा; 31 जुलैपर्यंत पैसे भरण्यास मुदतवाढ, 16 महिन्यांची लेट फी रद्द

सिडकोने घर लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे. घराचा एकही हफ्ता न भरलेल्या लोकांचं घर रद्द न करता, त्यांना 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 16 महिन्यांची लागलेली लेट फी सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : कोरोनाची स्थिती पाहता लोकांना दिलासा देण्यासाठी सिडकोने घर लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने 2018-19 मध्ये 25 हजार घरांची लॉटरी काढली होती. मात्र कोरोनामुळे बहुतांश लोकांना घर मिळूनही पैसे भरता आले नव्हते. पहिला हफ्ताही न भरल्याने अनेकांवर लॉटरीमध्ये लागलेले घर गमावण्याची वेळ आली होती. मात्र कोरोनामुळे लोकांची आर्थिक स्थिती खराब झाली. परंतु लोकांना त्यांच्या स्वप्नातील घरात राहायला जाता यावं यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. घराचा एकही हफ्ता न भरलेल्या लोकांचं घर रद्द न करता, त्यांना 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्यांचे काही हफ्ते बाकी आहेत, त्यांनाही 31 जुलैपर्यंत वेळ मिळणार आहे. 16 महिन्यांची लागलेली लेट फी सुद्धा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात आर्थिक कंबरडं मोडलं असताना, सिडकोने रद्द केलेल्या लेट फीमुळे घर लाभार्थ्यांचे लाखो रुपये वाचणार आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्या "सर्वांसाठी घरे" धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत घरांची घोषणा करण्यात आली होती. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25 हजार घरं प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी जाहीर करण्यात आली होती. या योजनेची सोडत पार पडली. यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करुन पात्र ठरलेल्या अर्जदारांना सदनिकेच्या किंमतीच्या रकमेचा ठराविक हफ्त्यांमध्ये भरणा करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर काही अर्जदारांनी एकाही हफ्त्याचा भरणा न केल्याचं तर काही अर्जदारांचे हफ्ते थकित असल्याचं आढळून आलं. या अर्जदारांच्या विनंतीवरुन सदनिकेचे हफ्ते भरण्यासाठी 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या अंतिम दिनांकापर्यंतही काही अर्जदार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरले होते. 

महामंडळाच्या गृहनिर्माण योजनेतील तरतुदींनुसार विहित मुदतीत हफ्ते न भरणाऱ्या अर्जदारांचे वाटपपत्र रद्द होऊ शकतं. परंतु कोविड-19 ची महामारी आणि त्यानंतर लागू केलेला लॉकडाऊन यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसंच या योजनेतील सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणं, या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन सिडको महामंडळाने सदनिकेचा एकही हफ्ता न भरलेल्या आणि उर्वरित हफ्ते थकित असणाऱ्या संबंधित अर्जदारांना हफ्ते भरण्यासाठी 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचं निर्णय घेतला. तसंच 25 मार्च 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत थकित हफ्त्यांवर लागू होणारी लेट फी माफ करणार असल्याचंही जाहीर केलं. या अंतिम मुदतीपर्यंत संबंधित अर्जदारांनी थकित हफ्त्यांचा भरणा करावा लागणार आहे. या निर्णयामुळे संबंधित अर्जदारांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. 

यासाठी संबंधित अर्जदारांनी सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन, त्यावरील Online Payment या टॅबचा वापर करुन आपल्या थकित हफ्त्यांच्या संपूर्ण रकमेचा भरणा करायचा आहे. दिलेल्या मुदतवाढीचा संबंधित अर्जदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन सिडकोतर्फे करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget