एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमची छाती फाडली तरी रामच दिसेल; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला
रामाशी नातं आहे हे शिवसेनेला अयोध्येत जाऊन सांगावं लागतं, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. तर, भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलंय.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केलीय. शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नातं आहे हे दाखवावं लागतं. मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल असं वक्तव्य पाटील यांनी केलंय. तर, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वावरुन भाजपवर टीकेचा बाण सोडलाय. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, शिवसेना भाजपपासून दूर गेलीय मात्र हिंदुत्त्वापासून दूर गेलेली नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतलाय.
महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केलीय. शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नातं आहे, हे दाखवावं लागतं. मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल असं वक्तव्य पाटील यांनी केलं. 1925 सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू राष्ट्राची सांस्कृतिक संकल्पना मांडली आहे. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद उद्धवजींना आधीपासून मान्य होता. आता काँग्रेसलाही मान्य झाला असेल तर फारच चांगलं आहे, असा टोलाही पाटील यांनी काँग्रेसला लगावला. याची देही याची डोळा आम्हाला हिंदू राष्ट्रवाद साकार झाल्याचे पाहायला मिळत असल्याचेही ते म्हणाले.
राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून एक कोटींचा निधी, उद्धव ठाकरेंची घोषणा
भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही : उद्धव ठाकरे
भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, शिवसेना भाजपपासून दूर गेलीय. मात्र, हिंदुत्त्वापासून दूर गेलेली नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय. रामलल्लाचं दर्शन घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. अयोध्येतल्या राम मंदिर निर्मितीसाठी शिवसेना 1 कोटींची आर्थिक मदत करणार आहे. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं सहकार्य मिळालं तर महाराष्ट्रासाठी विशेष भक्तनिवास उभारण्याचा मानस उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. दरम्यान चंद्रकांत पाटलांनी हिंदुत्त्वावरुन केलेल्या टीकेला उत्तर देणं उद्धव ठाकरेंनी टाळलंय.
शरयू नदीवर आरती नाहीच
कोरोना व्हायरसमुळे शरयू नदीवर आरती करू शकत नाही, याचं दुःख आहे. मात्र मी पुन्हा नंतर येईल आणि शरयूची आरती करेन. मी तिसऱ्यांदा अयोध्येत येणं हे माझं सौभाग्य आहे. अयोध्येत आल्यावर बाळासाहेबांची आठवण येते. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी मुख्यमंत्री होईल. मात्र, नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि काही दिवसात मुख्यमंत्री झालो. प्रत्येकवेळी रामाचं दर्शन घेतलं की मला काहीतरी चांगलं मिळतं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
Uddhav Thackeray Ayodhya Tour | शिवसेनेच्या आजच्या भूमिकेबाबत शंका : आशिष शेलार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement