![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
परमबीर सिंह यांना चांदिवाल आयोगाकडनं 5 हजार रूपयांचा दंड, रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश
मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चांदीवाल यांनी 30 मे रोजी पाच जणांना समन्स बजावून या आरोपांच्या अनुषंगाने 11 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.
![परमबीर सिंह यांना चांदिवाल आयोगाकडनं 5 हजार रूपयांचा दंड, रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश Chandiwal Commission fines Parambir Singh Rs 5,000, directs him to deposit money in CM covid relief fund परमबीर सिंह यांना चांदिवाल आयोगाकडनं 5 हजार रूपयांचा दंड, रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/16/a9db5eadd455dc7d8117bc621c4c225c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगाने मंगळवारी 5 हजारांचा दंड ठोठावला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल समिती करत आहे. परमबीर सिंह यांनी आयोगासमोर निर्देश देऊनही अद्याप प्रतिज्ञापत्र न दिल्यानं केल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला. दंडाची ही रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे आदेश आयोगानं जारी केले आहेत.
सचिन वाझे यांनाही मंगळावारी चांदिवाल आयोगापुढे हजर करण्यात आलं होतं. आयोगानं समन्स बजावून सचिन वाझेंना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सचिन वाझेंना आयोगासमोर हजर करण्यात आलं. मात्र वाझेंनी आयोगापुढे अर्ज करत जबाब देण्यासाठी वेळ मागून घेतली. हा अर्ज स्वीकारत आयोगानं त्यांना 5 जुलैपर्यंतची मुदत देत त्यादिवशी त्यांना पुन्हा आयोगासमोर हजर करण्याचे निर्देश जारी केले आहेत. अँटिलिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस दालातून बडतर्फ अधिकारी सचिन वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत एक पत्र लिहिलं आहे. हे पात्र जााहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीच टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप यातनं केलेला आहे. या प्रकरणानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेची दखल घेत कोर्टानं सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. तर या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशीही केली जात आहे.
मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चांदीवाल यांनी 30 मे रोजी पाच जणांना समन्स बजावून या आरोपांच्या अनुषंगाने 11 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात ज्यांच्यावर मुख्य आरोप आहेत, ते म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागणार अर्ज यापूर्वीच सदर केलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)