एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी, शिवसेनेची मागणी
थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याच्या यादीत सुधारणा करावी आणि शिवसेनाप्रमुखांचे नाव त्यात समाविष्ट करावे, अशा आशयाच्या ठरावाची सूचना लांडगे यांनी पालिका सभागृहात सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. राष्ट्रीय महापुरुष, थोर नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथींबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव समाविष्ट करण्यात यावे यासाठी पालिका सभागृहात ठराव मांडण्याची तयारी शिवसेना नगरसेवकाने सुरू केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या 46 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक राजकीय नेते घडविले. विरोधी पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल आदर आहे. निवडणूक न लढविता त्यांनी राजकारणावर अधिराज्य गाजविले. राज्य सरकारने राष्ट्रीय महापुरुष, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याबाबत नोव्हेंबर 2015 रोजी परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. परिपत्रकातील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करावा आणि शासन पातळीवर त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करावी, अशी मागणी नगरसेवक किरण लांडगे यांनी केली आहे.
राष्ट्रीय महापुरुष, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याच्या यादीत सुधारणा करावी आणि शिवसेनाप्रमुखांचे नाव त्यात समाविष्ट करावे, अशा आशयाच्या ठरावाची सूचना लांडगे यांनी पालिका सभागृहात सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका सभागृहाच्या जुलै महिन्यात होणाऱ्या बैठकीत ही ठरावाची सूचना मांडण्यात येणार आहे.
ही ठरावाची सूचना जर सभागृहात मंजूर झाली तर आयुक्तांद्वारे अभिप्राय देऊन ती नगरविकास खात्याकडे पाठवली जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
भारत
Advertisement