PNB Scam Case: PNB बँक घोटाळ्यातील एकमेव महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मंजूर, कविता माणकीकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
PNB Scam Case: PNB बँक घोटाळ्यातील एकमेव महिला आरोपीला 5 वर्षांनी जामीन मंजूर करण्यात आला आहे. रात्री 8 नंतर करण्यात आलेली अटक बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाकडून सुटकेचे निर्देश देण्यात आले आहेत.
![PNB Scam Case: PNB बँक घोटाळ्यातील एकमेव महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मंजूर, कविता माणकीकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा CBI court grant bail to only women accused in PNB case after 5 years PNB Scam Case: PNB बँक घोटाळ्यातील एकमेव महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मंजूर, कविता माणकीकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/84acfa9af29ec458f8aeaf0acb05d45c1675664651275275_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Punjab National Bank Scam: पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) प्रकरणात (Punjab National Bank Scam Case) अटकेत असलेल्या एकमेव महिला आरोपीला अखेर पाच वर्षांनी जामीन मिळाला आहे. नीरव मोदीच्या (Nirav Modi) कंपनीची माजी पदाधिकारी कविता मानकीकर (Kavita Mankikar) यांना विशेष सीबीआय (CBI) न्यायालयानं सोमवारी जामीन मंजूर केला आहे. मानकीकर यांचा जामीन अर्ज 1 जून 2018 पासून प्रलंबित होता.
महिला असूनही रात्री 8 वाजल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं काही वर्षांपूर्वी कविता मानकीकर यांची अटक बेकायदा ठरवली होती. मात्र त्यांना आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून पुन्हा अटक करण्याची मुभा सीबीआयला दिली होती. मात्र सीबीआयनं त्यांना पुन्ह कधीही अटक केली नाही. दरम्यान, साल 2018 मध्ये मानकीकर यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज केला होता. ज्यावर अखेरीस पाच वर्षांनी निकाल देण्यात आलाय.
याप्रकरणी आपल्याला अद्याप अटक केलेली नसून आपण खटल्याच्या सुनावणीसाठी नियमितपणे कोर्टात उपस्थित राहत असल्याचा दावाही मानकिकर यांनी जामीन अर्जात केला होता. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मेंजोगे यांनी त्यांची जामीनाची मागणी मान्य केली. मानकीकर यांचा जामीन अर्ज जून 2018 पासून प्रलंबित आहे आणि त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल झाले आहे. मानकीकर यांच्या अर्जावर सीबीआयनं प्रत्युत्तर दाखल करूनही बराच काळ लोटला असून मुंबई उच्च न्यायालयानंही मानकीकर यांची अटक बेकायदा ठरवताना त्यांना आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेनंतर अटक करण्याची मुभा सीबीआयला दिली होती. मात्र त्यांना पुन्हा अटक केलेली नाही. मानकीकर या नियमितपणे सुनावणीला उपस्थित असतात. त्यामुळे प्रकरणाच्या या टप्प्यावर त्यांचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळता येणार नाही, असेही नमूद करून न्यायालयानं कविता मानकीकर यांना अखेर नियमित जामीन मंजूर केला.
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून मेहुल चोक्सी आणि या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबासह भारतातून पसार झाला. सीबीआयने जानेवारी 2018 मध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडी, आयकर विभाग आणि इतर तपास यंत्रणांनी मोदी, मेहुल चोक्सी आणि बँकेचे अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड या समुहामध्ये फायरस्टोन ट्रेडिंग प्रा. लिमिचेड, एएननएम प्रा. लिमिटेड, एनडीएम एंटरप्रायजेस याशिवाय नीशल ट्रेडिंग अशा अनेक कंपन्याचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nirav Modi: पळपुट्या निरव मोदीला भारतात परत यावंच लागेल, ब्रिटनमधील सर्व कायदेशीर पर्याय संपले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)