एक्स्प्लोर
आमदार लिहलेल्या गाडीनं महिलेला उडवलं, चालक पोलिसांच्या ताब्यात
डोंबिवली: डोंबिवलीत एक 70 वर्षीय महिला भरधाव कारच्या धडकेत जखमी झाली आहे. या अपघातानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चालकाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मयूर नंदू असं या कारचालकाचं नाव असून अपघात झाला तेव्हा तो दारुच्या नशेत होता. विशेष म्हणजे ज्या कारनं महिलेला धडक दिली त्या कारवर भाजपचा लोगो आहे. तसेच पुढच्या बाजूस आमदार असं लिहलं आहे. अटक केल्यावर कारचालकानं भिवंडीचे भाजप आमदार महेश चौगुले यांच्या नावाचं कार्ड पोलिसांना दाखवलं.
याबाबत आमदार महेश चौगुलें यांच्याशी संपर्क साधला असता, ही गाडी आपली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं भाजपचा लोगो आणि आमदार नाव असलेली ही गाडी नेमकी कोणाची? आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement