एक्स्प्लोर
Jet Airways Hijack Hoax | विमान अपहरणाची धमकी, मुंबईकर उद्योगपतीला जन्मठेप
30 ऑक्टोबर 2017 रोजी जेट एअरवेजच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या टॉयलेट टिश्यूवर उद्योगपती बिर्जू सल्लाने इंग्रजी आणि उर्दू भाषेत विमान हायजॅक झाल्याची चिठ्ठी लिहिली होती
![Jet Airways Hijack Hoax | विमान अपहरणाची धमकी, मुंबईकर उद्योगपतीला जन्मठेप Businessman Birju Salla gets life term, Rs 5 crore fine for hijack hoax Jet Airways Hijack Hoax | विमान अपहरणाची धमकी, मुंबईकर उद्योगपतीला जन्मठेप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/11214045/Jet-Airways-Hijack-Threat-Birju-Salla.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रेल्वेत बॉम्ब, विमान अपहरण यासारख्या अफवा पसरवून यंत्रणांना जेरीस आणणाऱ्या महाभागांवर वचक बसावा, यासाठी एनआयएच्या विशेष कोर्टाने कठोर पावलं उचलली आहेत. 2017 मध्ये जेट एअरवेजच्या विमानाचं अपहरण करण्याची खोटी धमकी देणाऱ्या मुंबईतील उद्योगपतीला थेट जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
30 ऑक्टोबर 2017 रोजी जेट एअरवेजच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या टॉयलेट टिश्यूवर इंग्रजी आणि उर्दू भाषेत विमान हायजॅक झाल्याची चिठ्ठी लिहिण्यात आली होती. बिजनेस क्लासने प्रवास करणाऱ्या बिर्जू सल्ला या 38 वर्षीय उद्योगपतीने हा पराक्रम केला होता. बिर्जूने अपहरणाची धमकी दिल्याचं समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात अँटी-हायजॅकिंग कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. राष्ट्रीय उड्डाणबंदी असलेल्या प्रवाशांच्या यादीत (नो फ्लायर्स लिस्ट) समावेश झालेला तो पहिलाच प्रवासी होता.
एनआयएच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश एम के दवे यांनी बिर्जू सल्ला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचप्रमाणे त्याला पाच कोटी रुपयांचा दंडही बजावला आहे. वैमानिक आणि सहवैमानिकाला प्रत्येकी एक लाख, दोन हवाई सुंदरींना प्रत्येकी 50 हजार, तर विमानातील प्रत्येक सहप्रवाशाला 25 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश सल्लाला कोर्टाने दिले आहेत. त्यावेळी विमानात दोन वैमानिक, सात क्रू मेंबर्स आणि 116 प्रवासी होते.
केबिन क्रूला विमानाच्या स्वच्छतागृहात कथित हायजॅकिंगची चिठ्ठी मिळाल्यानंतर वैमानिकाने अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केलं होतं. विमानाच्या कार्गोमध्ये हायजॅकर आणि बॉम्ब असल्याचं या चिठ्ठीमध्ये खोटं लिहिण्यात आलं होतं. मैत्रिणीला धडा शिकवण्यासाठी ती कार्यरत असलेल्या जेट एअरवेजच्या बदनामीचा कट सल्लाने रचल्याचं एनआयएने आरोपपत्रात म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)