एक्स्प्लोर

बेस्टच्या बस डेपोमध्ये करता येणार गाड्यांचं पार्किंग, मुंबईकरांच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीवर महापालिकेचा तोडगा

मुंबईमध्ये होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून ज्यादा दंड आकरण्याचं सांगितलं गेलं होतं. याच वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून आता बेस्ट पुढे सरसावलं आहे.

  मुंबई: मुंबईकरांच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यात एक मोठा त्रास तो म्हणजे वाहतूक कोंडी. दररोज मुंबईकरांचा वेळ प्रवासातच वाया जातो, त्या गाड्या पार्क करण्यासाठी जागासुद्धा उपलब्ध नसतात. या अडचणीवर बेस्टने एक तोडगा काढला आहे. ही रोजची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बेस्ट त्यांच्या 27 बस डेपोवर पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर पाच हजार ते पंधरा हजारांपर्यंत दंड आकारले होते. यावर मुंबईकरांचा संमिश्रित प्रतिसाद होता, काहींनी याचं समर्तन केलं तर अनेकांनी विरोध.  मुंबईमध्ये होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून ज्यादा दंड आकरण्याचं सांगितलं गेलं होतं. याच वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून आता बेस्ट पुढे सरसावलं आहे. मुंबईतील बेस्टच्या तब्बल 27 बस डेपों च्या जागा खाजगी पार्किंगसाठी देण्यात येणार आहेत. मुंबईतल्या पार्किंगच्या समस्येवर 'बेस्ट' उपाय, बेस्टच्या 27 डेपोमध्ये खाजगी वाहनांना पार्किंगची मुभा मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला बसआगार आणि बसस्थानकांमध्ये खाजगी वाहनांचे पार्किंग 'पे अँड पार्क' योजनेअंतर्गत करण्याची सूचना केली होती, तसेच ‘मुंबई पार्किंग अथऑरिटीने’ पार्किंगचे दर कमी ठेवण्याचा सल्ला दिला होता ज्यामुळे लोकांचा 'पे अँड पार्क'ला चांगला प्रतिसाद मिळेल. बेस्टच्या ताफ्याता 3000 पेक्षा जास्त बसेस आहेत ज्यांच्या पार्किंग नंतर उर्वरित जागेवर ही पे अँड पार्क सुविधा असणार आहे. बेस्टच्या बसेसला यामुळे पार्किंगसाठी कुठलीही अडचण येणार नाही.  प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणावर पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे. प्रत्येक डेपोला पार्किंगचे नियोजन आणि देखरेख करण्याची जबाबदारी बेस्ट ने दिली आहे. या पार्किंग सुविधेमुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा आणि पार्किंगचा प्रश्न सुटणार असून बेस्टच्या बसेस ज्या रस्त्यावर धावतात त्यांना सुद्धा वेग मिळेल आणि रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात का होईना कमी होण्याची शक्यता आहे. बेस्ट डेपोवरील पार्किंगसाठीचे दर कसे असणार आहेत? 3 तासापर्यंतचे दर दुचाकी- 20 रुपये तीन चाकी/ चार चाकी - 30 रुपये रिक्षा / टॅक्सी - 30 रुपये ट्रक / टेम्पो - 55 रुपये बस - 60 रुपये 6 तासांपर्यंतचे दर दुचाकी - 25 रुपये तीन चाकी/ चार चाकी - 40 रुपये रिक्षा / टॅक्सी - 40 रुपये ट्रक / टेम्पो - 90 रुपये बस - 95 रुपये 12 तासांपर्यंतचे दर दुचाकी - 30 रुपये तीन चाकी/ चार चाकी - 70 रुपये रिक्षा / टॅक्सी - 70 रुपये ट्रक / टेम्पो - 165 रुपये बस - 175 रुपये 12 तासांपेक्षा जास्तचे दर दुचाकी - 35 रुपये तीन चाकी/ चार चाकी - 80 रुपये रिक्षा / टॅक्सी - 80 रुपये ट्रक / टेम्पो - 205 रुपये बस - 215 रुपये 12 तासांठीचे मासिक दर दुचाकी - 660 रुपये तीन चाकी/ चार चाकी - 1540 रुपये रिक्षा / टॅक्सी - 1540 रुपये ट्रक / टेम्पो - 3630 रुपये बस – 2000 रुपये 24 तासांसाठी मासिक भाडं दुचाकी - 1320 रुपये तीन चाकी/ चार चाकी - 3080 रुपये रिक्षा / टॅक्सी - 3080 रुपये ट्रक / टेम्पो - 7260 रुपये बस – 3700 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget