एक्स्प्लोर
कल्याणः लोकलमध्ये दारु पार्टी, प्रकार कॅमेऱ्यात कैद

कल्याणः मुंबईच्या लोकलमध्ये खुलेआम दारू प्यायली जात आहे. बदलापूरला जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दीच्या वेळी एक युवक दरवाजा अडवून खुलेआम दारू पित होता. मोहित शेलार असं युवकाचं नाव असून तो वांगणीला राहतो. दारु पिण्यास विरोध करणाऱ्या प्रवाशांना मोहितने उर्मटपणे उत्तरं दिली. मोहित लोकलमधी प्रवाशांशी उर्मट भाषेत बोलत होता. हा संपूर्ण प्रकार एका प्रवाशानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. विशेष म्हणजे महिला डब्याला लागूनच पुरूष डबा होता आणि त्यामुळेच अशा लोकलमध्ये दारू पिणाऱ्यांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. लोकलमधील ग्रुपबाजी करणाऱ्यांच्या दादागिरीमुळे अनेक जण तक्रारी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अशा मवाली लोकांचं फावतं. मात्र एका जागरुक प्रवाशानं या प्रकाराचं चित्रीकरण केलं. या तरुणावर रेल्वे पोलिस काही कारवाई करणार का, याकडे लक्ष लागलं आहे. पाहा व्हिडिओः
आणखी वाचा























