एक्स्प्लोर
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
गेल्यावर्षी कर्मचाऱ्यांना 14000 रुपये बोनस देण्यात आला होता. यामध्ये वाढ करुन या वर्षी 14500 बोनस जाहीर करण्यात आला आहे.
![मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर Bonus Declared To Mumbai Municipal Corporation Employees Latest Update मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/02/03171243/bmc-01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बोनसमध्ये 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी कर्मचाऱ्यांना 14000 रुपये बोनस देण्यात आला होता. यामध्ये वाढ करुन या वर्षी 14500 बोनस जाहीर करण्यात आला आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना यावेळेस किमान ४० हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने केली होती. मात्र, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे पैसेच नसल्यानं 14 हजारापेक्षा जास्त बोनस देता येणार नाही असं सांगण्यात आलं होतं. अखेर 500 रुपये वाढवून बोनस देण्यात आला.
दिवाळीच्या तोंडावर मुंबई महापालिकेतील कर्मचारी संघटना बोनससाठी आक्रमक झाल्या होत्या. मात्र, प्रशासनानं आपली बाजू समजावून देत कर्मचारी संघटनांशी यशस्वी बोलणी केली. त्यानंतर हा बोनस जाहीर करण्यात आला.
संबंधित बातम्या :
बोनससाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचारी संघटना एकवटल्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)